Top Newsराजकारण

ममता बॅनर्जी, आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांच्या भेटींनंतर चर्चेला उधाण

मुंबई : देशात सध्या भाजपला जोरदार टक्कर देणारे पक्ष म्हणून तृणमूल काँग्रेस आणि शिवसेनेकडे पाहिलं जात आहे. अशावेळी तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या तीन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. अशावेळी युवासेनेचे अध्यक्ष आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत आणि ममता बॅनर्जी यांची मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रीय राजकारण आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची महत्वाची माहिती सूत्रांनी दिली आहे.

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या बरोबर ममता बॅनर्जी यांना भेटलो. राजकारण व बंगाल महाराष्ट्र नात्यावर चर्चा झाली.ममताजी आज सिध्दीविनायक मंदिरात गेल्या. तेथे त्यांनी उद्धवजींच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली. महाराष्ट्र -बंगाल हे लढणारे प्रदेश आहेत, झुकणारे नाहीत असे त्या म्हणाल्याचं संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे सांगितलं. त्यामुळे आगामी काळात भाजप विरोधात प्रादेशिक पक्षांना सोबत घेऊन ममता बॅनर्जी मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आता सुरु झाली आहे.

राजकीय चर्चा नाही : आदित्य ठाकरे

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आज मुंबईमध्ये आल्या आहेत. जेव्हाही मुंबईच्या दौऱ्यावर त्या येतात तेव्हा आम्ही त्यांची भेट घेत असतो. आमच्यात एक वेगळे नाते आहे. आज कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. या बैठकीत औपचारिक चर्चा झाली. दोन्ही राज्यांमध्ये चांगला संवाद आहे. ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायची होती. मात्र, मुख्यमंत्री रुग्णालयात असल्यामुळे भेट होऊ शकली नाही, असं आदित्य ठाकरे यांनी भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं.

स्वाभाविक होतं की त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घ्यायची होती. मात्र, मुख्यमंत्री रुग्णालयात असल्यामुळे भेट होऊ शकली नाही. तर मी त्यांना भेटण्यासाठी आलेलो आहे. मला स्वतःहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेटण्यासाठी पाठवले. मी शुभेच्छा देखील दिल्या आणि त्यांनी एक शुभ संदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी दिलेला आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

काँग्रेसला डिवचण्याचा डाव

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी काँग्रेसला डिवचून, शिवसेना आणि राष्ट्रवादी नेत्यांशी भेट घेत आहेत. महाराष्ट्रात, महाविकास आघाडीचे सरकार आहे, ज्यात काँग्रेसचाही समावेश आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांनी सत्तेत असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादीला स्पष्ट महत्त्व दिले आहे आणि काँग्रेसला डिवचले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आणि राष्ट्रीय स्तरावर काय नवीन राजकीय समीकरणं असतीस, याकडे सगल्यांचं लक्ष लागल आहे.

एकेकाळी काँग्रेस आणि ममता बनर्जी यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते. भारतात भाजपला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र आले होते, ज्यात काँग्रेस आणि तृणमूल आघाडीवर होते. पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने तृणमूलसोबत युती केली नसली तरी अप्रत्यक्षपणे पाठिंबा दर्शवला होता.

आता ममता बॅनर्जी आणि काँग्रेस पक्षाचे संबंध बिघडल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारे, भाजपला केंद्रातील सत्तेतून बाहेर काढण्यासाठी, काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्षांना बाजूला सोडून, ममता बॅनर्जी देशाला तिसऱ्या आघाडीचा परयाय देण्याचा प्रयत्न करीत आहेत, असं चित्र दिसतय. नुकत्याच झालेल्या दिल्ली दौऱ्यात ममतांनी विविध पक्षांच्या अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. मात्र, त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली नाही. त्याऐवजी अनेक काँग्रेसचे नेते तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button