Top Newsराजकारण

नरेंद्र मोदींनंतर ‘ठाकरे’ हाच राष्ट्रीय ब्रँड : खा. संजय राऊत

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेतली जात आहे. महाराष्ट्राचं नेतृत्व आता देशानं स्वीकारलंय. त्यामुळे मोदींनंतर ‘ठाकरे’ हाच ‘राष्ट्रीय ब्रँड’ असल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंमध्ये देशाचं नेतृत्व करण्याची धमक असल्याचं विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

शिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ते म्हणले की, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंना राष्ट्रीय स्तरावर स्वीकारण्यात आलं आहे. मोदींनंतर देशाला नेतृत्व देणारं कोण? असं विचार लोकांना पडतो. आज देशाच्या राष्ट्रीय पक्षाला मोठं आव्हान निर्माण करतील अशी ताकद ‘ठाकरे ब्रँड’मध्ये आहे. देश आज ज्या संकाटातून जातोय ते पाहता देशाला आज संयमी आणि शांत स्वभावाच्या नेत्याची गरज आहे. मोदी मोठे नेते आहेतच पण त्यांच्यानंतर कुणी नाही असं होत नाही. उद्धव ठाकरे आज राज्यात कोणतीही आदळआपट न करता शांतपणे उत्तम काम करतायत. ते मुख्यमंत्री होतील असं कुणाला वाटलं नव्हतं. पण आज ते ज्या पद्धतीनं काम करतायत ते संपूर्ण देश पाहातोय. त्यामुळे आगामी काळात उद्धव ठाकरे नक्कीच देशाला नेतृत्व देऊ शकतील, असं ठाम विधान संजय राऊत यांनी केलं आहे.

भारत देश हा काही लहान देश नाही. खंडप्राय देश आहे. त्यामुळे केवळ एक नव्हे, अनेक ताकदीचे नेते सोबत असतात. नेहरू आणि इंदिरांच्या काळतही तितकेच ताकदीचे १० नेते होते. त्यामुळे नवं नेतृत्व हे नेहमीच देशाला लाभत असतं. मोदी तर आहेतच पण देशात आज उद्धव ठाकरेसुद्धा ताकदीचं नेतृत्व आहे, असं राऊत म्हणाले.

राज्यात काँग्रेस पक्षानं स्वबळाचा नारा दिला आहे. याबाबत विचारण्यात आलं असता संजय राऊत यांनी केंद्रीय नेतृत्वातून अद्याप तसं काही आम्हाला सांगण्यात आलेलं नाही असं म्हणत काँग्रेसच्या स्वबळाची हवाच काढून टाकली. नाना पटोले यांच्याकडून सातत्यानं सांगितलं जातंय की स्वबळावर लढू आणि मुख्यमंत्री बनू, पण त्यांच्या राष्ट्रीय नेतृत्वानं तसं काही अद्याप कळवलेलं नाही. सोनिया आणि राहुल गांधी यांनी जर तसं गो अहेड दिलं असेल तर ते त्यांच्या पक्षाचं धोरण आहे. पण त्यांनी काही अद्याप सांगितलेलं नाही. केंद्रीय नेत्यांकडून तशा काही सूचना आलेल्या नाहीत, असं राऊत म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button