अभिनेते सतीश कौल यांचे कोरोनामुळे निधन
लुधियाना : बीआर चोप्रा यांच्या अत्यंत लोकप्रिय ‘महाभारत’मध्ये इंद्र देवाची भूमिका साकारणारे हिंदी/पंजाबी अभिनेते सतीश कौल यांचे कोरोनामुळे निधन झाले. एका आठवड्यापूर्वी कोरोना पॉझिटिव्हवर आल्यानंतर त्यांना लुधियाना येथील श्री रामा चॅरिटेबल ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. ते 72 वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून सतीश कौल यांची काळजी घेत असलेल्या सत्या देवी यांनी लुधियानाहून फोनवर या बातमीला दुजोरा दिला आहे. त्यांचा अंत्यविधी उद्या लुधियाना येथे केला जाणार आहे.
सतीश कौल यांनी सुमारे 300 हिंदी आणि पंजाबी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘महाभारत’, ‘सर्कस’ आणि ‘विक्रम वेताळ’ या अतिशय लोकप्रिय मालिकांमध्ये ते वेगवेगळ्या पात्रांमध्ये दिसले होते. पण सतीश कौल यांचे आयुष्य आजारपण आणि आर्थिक संकटामध्ये सुरु होते. गेल्या वर्षी लॉकडाउनमध्ये सतीश कौल यांना लुधियानाच्या एका छोट्या घरात राहण्यास भाग पडले. दर महिन्याला त्यांना घरभाडे आणि औषधांसाठी पैसे मिळावण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला.
पटियालामध्ये पडल्यामुळे हिप हाड फॅक्चर झाल्याने त्यांना चंदीगडच्या रुग्णालयात दाखल करावे लागले. ते मरेपर्यंत या आजारातून उभे राहू शकले नाही. बऱ्याच वर्षानंतरही त्यांना व्यवस्थित चालता येत नव्हती. अडीच वर्षे रुग्णालयात राहिल्यानंतर सतीश कौल दीड वर्षे वृद्धाश्रमात राहिले. सुमारे 25 वर्षांपूर्वी त्यांनी पालकांच्या कर्करोगाच्या उपचारांसाठी मुंबईतील वर्सोवा येथे त्यांचा फ्लॅट अडीच लाख रुपयांना विकला. उर्वरित पैशांमधून त्यांनी लहान बहिणीचे लग्न देखील केले. काही वर्षांपूर्वी लुधियानामध्ये त्यांनी एक अभिनय शाळादेखील भागीदारीत उघडली होती. पण, यात त्यांना 20 लाख रुपयांहून अधिक रुपयांचे नुकसान सहन करावे लागले.
सतीश कौल यांचा लग्नाच्या एक वर्षानंतरच पत्नीपासून घटस्फोट झाला होता. बायकोने पुन्हा लग्न केले आणि एका मुलासह डर्बन (दक्षिण आफ्रिका) येथे राहायला गेली. स्वतःला सतीश कौल फॅन म्हणून वर्णन करणारी सत्या देवी गेली 7 वर्षे त्यांची काळजी घेत होती. 69 वर्षीय सत्या देवी आणि सतीश कौल यांच्या नात्याबद्दल लोकांनी नावं उठली. मात्र, सर्वात वाईट काळातही सत्या देवीने त्यांचा मृत्यू होईपर्यंत साथ सोडली नाही.
1969 मध्ये फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये (FTII) शिकत असताना जया बहादुरी, डॅनी डेंगजोप्पा, आशा सचदेव, अनिल धवन हे त्यांचे बॅचमेट होते. शिक्षण संपल्यानंतर सतीश कौल यांना बर्याच पंजाबी चित्रपटात नायक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी काम केलंय, पण त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही. दिलीप कुमार, देव आनंद, विनोद खन्ना यांच्या सारख्या बॉलीवूड कलाकारांसोबत त्यांनी काम केले असले तरी. त्यांना बॉलिवूडमध्ये जी प्रसिद्धी मिळाली ती पंजाबी चित्रपटांतून मिळाली.