अर्थ-उद्योग

कॉव्हेस्ट्रोकडून डीएसएमच्या रेझिन्स अँड फंक्शनल मटेरिअल व्यवसायाचे संपादन

मुंबई : कॉव्हेस्ट्रोने रॉयल डीएसएम या डच कंपनीच्या रेझिन्स अँड फंक्शनल मटेरिअल्स (आरएफएम) व्यवसायाचे यशस्वीपणे संपादन केले आहे. कॉव्हेस्ट्रो आणि डीएसएम यांनी सप्टेंबर 2020 मध्ये या संदर्भातील संपादन करारावर स्वाक्षरी केल्यानंतर या व्यवहाराला नियमनात्मक मंजुरी मिळाली. या व्यवहारामुळे कॉव्हेस्ट्रोच्या शाश्वत कोटिंग रेझिन्स पोर्टफोलिओमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. त्यामुळे हा समूह जगातील आघाडीच्या पुरवठादारांपैकी एक ठरणार आहे. आरएफएमचा समावेश केल्याने समूहाच्या उत्पन्नामध्ये अंदाजे 1 अब्ज युरोची वाढ होणार आहे आणि समूहाच्या जागतिक उत्पादन जाळ्यामध्ये 20 हून अधिक ठिकाणांची भर पडणार आहे.

“आरएफएमचे संपादन केल्यामुळे समूहाच्या नव्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी मोठे योगदान मिळणार आहे. या व्यवहारामुळे, शाश्वततेच्या दिशेने आम्ही एक पाऊल टाकणार आहोत, तसेच शाश्वत वाढही साध्य करणार आहोत,” असे कॉव्हेस्ट्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मार्कुस स्टेलेमन यांनी स्पष्ट केले. “नव्या सहकाऱ्यांना भेटण्यासाठी आणि त्यांचे कॉव्हेस्ट्रोमध्ये स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

या व्यवहारामुळे कॉव्हेस्ट्रो विविध क्षेत्रांमध्ये व्यवसायाचा विस्तार करणार आहे. समूह वॉटर-बेस्ड पॉलियुरेथेन डिस्पेन्सरच्या बाबतीत जगातील एक आघाडीचा पुरवठादार आहे. आरएफएमच्या संपादनामुळे वॉटर-बेस्ट पॉलिअॅक्रिलेट रेझिन्सची संपूर्ण रेंज समाविष्ट केली जाणार आहे, तसेच शाश्वततेच्या बाबतीत सक्षम ब्रँड समाविष्ट होणार आहेत, जसे अॅडिटिव्ह उत्पादनासाठी आणि प्रगत सोलार कोटिंग व्यवसायात वापरले जाणारे Niaga®. याबरोबरच, वॉटर-बेस्ड हायब्रिड तंत्रज्ञानाचा, पावडर कोटिंग रेझिन्सचा व रेडिएशन क्युरिंग रेझिन्सचा समावेश करण्यासाठी कॉव्हेस्ट्रो आपल्या तंत्रज्ञान उत्पादनांमध्ये वाढ करत आहे.

कॉव्हेस्ट्रोच्या चीफ कमर्शिअल ऑफिसर सुचेता गोविल म्हणाल्या: “या व्यवहाराच्या निमित्ताने आमचा पोर्टफोलिओ आणखी सक्षम होणार आहे आणि त्यामध्ये नावीन्यपूर्ण उत्पादनांचा व तंत्रज्ञानाचा समावेश होणार आहे. त्यामुळे आम्हाला ग्राहकांना उत्तम सेवा देणे शक्य होणार आहे. टीम एकत्र आणणे, गुणवत्तेचा योग्य वापर करणे आणि आमच्या नव्या व जुन्या ग्राहकांना शक्य तितकी चांगली सेवा देणे, यावर आम्ही भर देत आहोत.”

सर्वमावेशक विश्लेषण केल्यानंतर, 2025 पर्यंत पूर्णतः एकात्मिकरण झाल्यावर दोन्ही कंपन्यांच्या क्षमतांमुळे दरवर्षी अंदाजे 120 दशलक्ष इतका कायमस्वरूपी परिणाम दिसून येईल, अशी अपेक्षा कॉव्हेस्ट्रोने व्यक्त केली आहे. यामध्ये अंदाजे दोन-तृतियांश कॉस्ट आणि एक चतुर्थांश भाग उत्पन्न या बाबतीतील सहयोगाचा असेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button