पुणे : राज्याला चार पाच दिवसांत दहा लाख कोरोना प्रतिबंध लस मिळते. ती रोज मिळायला हवी. सध्या दोन तीन लाख मिळत आहेत. आम्ही केंद्राकडे जास्तीत जास्त लस मागणी करणार आहोत. त्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना घेऊन भेटायला जाणार आहोत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते पुण्यात बोलत होते.
जिथे जिथे पूरस्थिती असेल, तिकडे आरोग्य व्यवस्था सुरू केल्या आहेत. या भागात लसीकरण करा असं सांगितलं आहे, आरोग्य युनिट तयार करण्यात आल्या आहेत, सर्व जण मदत करतील. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अलर्ट देत असतो त्यानुसार योजना केल्या जात असतात, अशी माहिती टोपे यांनी दिली.
केंद्राकडून ज्या कोरोना प्रतिबंधक लस येतात त्या आम्ही तातडीने देतो. केंद्राच्या धोरणाप्रमाणे राज्याला लस मिळते. आयसीएमआरने जे जे प्रोटोकॉल दिले, ते पाळले. आता जर त्यांनी काही गाईड लाईन दिल्या तर त्याच्यानुसार निर्णय घेतले. शाळा सुरू करा असं सांगितले तर आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत बसून निर्णय घेऊ, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आम्ही सगळे शिथिलता देण्याबाबत रिपोर्ट मागवत आहोत. काही ठिकाणी शिथिलता देण्यात येतील का याचा रिपोर्ट मागवला आहे, लवकरच त्याचा निर्णय घेण्यात येईल, असं टोपे म्हणाले.