आरोग्यमनोरंजन

अभिनेता आमिर खानला कोरोनाची लागण

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आमिर खानला कोरोनाची लागण झाली आहे. त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर येत आहेत. आमिर खान सध्या होम क्वारंटाईन आहे.

आमिर खानच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आमिर खान याला कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर आमिर खान सेल्फ क्वारंटाईन झाला आहे. आमिर खानची प्रकृती सध्या बरी आहे. आमिर खानच्या संपर्कात आलेल्यांनी सर्वांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वत: ची कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे आवाहन आमिर खानने केले आहे. दरम्यान दोन दिवसांपूर्वी जागतिक जल दिनाचे औचित्य साधून पाणी फाऊंडेशन “सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेचा (पहिला टप्पा) गौरव सोहळा” आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थितीत होते. यावेळी पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान आणि त्यांच्या पत्नी किरण राव यादेखील सहभागी होत्या. त्याशिवाय समृद्ध गाव योजनेतील गौरवाला पात्र ठरलेल्या गावातील नागरिक,राज्याच्या 18 जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ही या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाले होते. त्यामुळे या कार्यक्रमातील अनेक व्यक्ती क्वारंटाईन होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button