आरोग्यशिक्षण

एका बेंचवर एक विद्यार्थी, पालकांची परवानगी अनिवार्य; शाळा सुरु करताना बीएमसीची नियमावली

मुंबई : मुंबईतल्या शाळा (आठवी ते बारावीचे वर्ग) ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहेत. राज्य सरकारनं दिलेल्या नियमांचं काटेकोर पालन करुन शाळा सुरु होणार आहेत. नियमावलीनुसार एकदिवसाआड शाळा भरतील. एका बेंचवर एकाच विद्यार्थ्याला बसायला परवानगी असणार आहे. तसंच विद्यार्थ्याला शाळेत यायला पालकांची परवानगी असणार आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

कोरोना आजूनही संपला नाही. सगळ्यांनीच काळजी घ्यायला हवी. आता आपणही काळजी घेऊन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबईतील शाळा ४ ऑक्टोबरपासून सुरु होत आहेत. विदयार्थ्यांनी कोरोना नियमांचं काटेकोर पालन करणे गरजेचे आहे, असं महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या.

शाळेसाठी नियमावली

– एका बेंचवर एक विद्यार्थी
– शाळा प्रवेशासाठी पालकांची मंजुरी आवश्यक
– सर्व विद्यार्थी शाळेत येणार असतील तर एक दिवस आड शाळा
– एका दिवशी १५ ते २० विद्यार्थ्यांनाच प्रवेश
– सोशल डिस्टन्सिंग पाळणं आवश्यक
– मास्क परिधान करणे आवश्यक
– सॅनिटायजर वापरणं गरजेचं

शिक्षकांचं ७० टक्के लसीकरण पूर्ण

मुंबईत शिक्षकांसाठी विशेष लसीकरण मोहीम सुरू आहे. शिक्षकांचं ७० टक्के लसीकरणही झालं आहे. पालिकेच्या १० हजार शिक्षकांपैकी ७ हजार शिक्षकांचं लसीकरण झालं आहे. या सर्वांचा आढावा घेण्यात येणार आहे, असंही महापौर पेडणेकर यांनी सांगितलं.

शाळा सुरु होत आहेत पण विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची मंजुरी आवश्यक असेल, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे पालक मंजुरी देणार नाहीत त्यांना उपस्थित राहण्यासाठी सक्ती करु नये, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button