देशभरामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. मागील काही दिवसांपासून करोनाचे चारलाखांहून अधिक रुग्ण रोज आढळून येत आहेत.. देशातील सध्याची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार अपयशी ठरत असल्याची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयासह उच्च न्यायालयांनी करत सरकारच्या नियोजन शून्यतेवर चिंता व्यक्त केली. देशात दररोज कोरोना रुग्णांचा आणि विषाणूच्या बळींचा नवा कळस समोर येत असताना जगभरातील अनेक माध्यमांनी भारताच्या कोरोना हाताळनीतील दोष दाखवतना टीकेचा सूर लावत गंभीर इशारा दिला आहे. वैद्यकीय क्षेत्रातील प्रसिद्ध नियतकालीक असलेल्या द लान्सेटने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत गंभीर इशारा दिला आहे.
गर्दीच्या कार्यक्रमांमुळे देशात करोनाचा धोका वाढू शकतो, असा इशारा देण्यात आलेला असतानाही मोदी सरकारने देशातील कोट्यवधी लोकांना आकर्षित करणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांना परवानग्या दिल्या. राजकीय प्रचारसभा घेण्यात आल्या, असं म्हणत वैद्यकीय क्षेत्रातील प्रसिद्ध नियतकालीक असलेल्या द लान्सेटने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. देशात करोना संसर्गाचा उपद्रव झाला असून, या पार्श्वभूमीवर ‘द लान्सेट’ने संपादकीयमधून पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. करोना नियंत्रणात आणण्यापेक्षा टीकाकारांची तोंड दाबण्यास मोदींचं प्राधान्य दिसत असल्याचं असल्याचंही लान्सेटनं म्हटलं आहे.
करोनावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा मोदी सरकारचं प्राधान्य हे ट्विटरवरील टीकाकारांना गप्प करण्याकडे असल्याचं दिसत आहे. तसेच संकटाच्या काळात होणारी टीका आणि खुल्या चर्चेत अडथळा आणण्याची मोदी सरकारची कृती अक्षम्य असल्याची घणाघाती टीका लान्सेटने केली आहे. ‘इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन’ या संस्थेनं दिलेल्या इशाऱ्याचा हवाला संपादकीयमध्ये कोट करून देण्यात आला आहे. भारतात १ ऑगस्टपर्यंत करोनामुळे दहा लाख लोकांचा मृत्यू होईल, असा अंदाज या संस्थेनं व्यक्त केलेला आहे. ”जर हे घडलं, तर या राष्ट्रीय आपत्तीला मोदी सरकारचं जबाबदार असेल.”
करोनाचा संसर्ग अधिक वेगाने होण्याचा धोका असलेल्या कार्यक्रमांबाबत इशारा दिलेला असतानाही सरकारने लाखो लोक गर्दी करतील अशा धार्मिक कार्यक्रमांना परवानगी दिली. राजकीय मेळावे घेतले. तर दुसरीकडे करोनाला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायाचा प्रचंड अभाव आहे, असंही लॅन्सेटने म्हटलं आहे. केवळ रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर करोनावर विजय मिळविल्याच्या फुशारक्या मारण्यास सुरूवात केली, हे सगळं करोनाच्या नव्या स्ट्रेनसह देशात दुसरी लाट येण्याचा इशारा दिला जात असताना सरकारने केलं. याशिवाय आरोग्य यंत्रणा कोलमडत असल्याच्या मुद्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. याशिवाय या संकटाला तोंड देण्याबाबतच्या सरकारच्या आत्मसंतुष्टतेवरही टीका केली गेली आहे.
भारताने कोरोना विरुद्ध लढ्याच्या रणनीतीत बदल न केल्यास १ ऑगस्ट पर्यत देशातील दहा लाख लोकांचा कोरोना मुळे मृत्यू होईल,असा गंभीर इशारा लान्सेटने दिला आहे.भारताने सुरुवातीच्या काळात सुरुवातीच्या काळात कोरोनवर नियंत्रण मिळवले होते. मात्र त्यानंतर एप्रिल महिन्यात कोव्हीड टास्क फोर्डची बैठक झाली नाही. त्यामुळे आता देशात दहा लाख लोकांचा मृत्यू झाल्यास त्या आपत्तीला मोदी सरकारच जबाबदार असेल,असे या लेखात म्हटले आहे.या गंभीर इशाऱ्या नंतर मोदी सरकार काय करणार आहे.? तिसरी लाट अधिक गंभीर राहण्याची शक्यता असून तिसऱ्या लाटेसाठी सरकार कोणती रणनीती आखणार आहे, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.