राजधानी दिल्लीत आज रात्रीपासून ८ दिवसांचा लॉकडाऊन
नवी दिल्ली : अतिशय घातक कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर हानी टाळण्यासाठी राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा लॉकडाऊनचं चित्रं दिसणार आहे. दिल्लीत आज रात्रीपासून पुढच्या सोमवारी सकाळपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यासंदर्भात औपचारिक घोषणा केली आहे. ‘हा छोटा लॉडाऊन आहे. घाबरू नका. मजूर भावा-बहिणींनी आपापल्या गावी जाण्यासाठी माघारी फिरू नये. केंद्र सरकारकडून संपूर्ण सहकार्य मिळत आहे’, असा दिलासाही केजरीवाल यांनी नागरिकांना दिला आहे.
आज रात्रीपासून नागरिकांना सक्तीनं लॉकडाऊनचं पालन करावं लागणार आहे. त्यामुळे, नागरिकांना २६ एप्रिलपर्यंत घरातच राहावं लागेल. दिल्लीत यापूर्वी विकेन्ड कर्फ्यू जाहीर करण्यात आला होता. शहरात केवळ १०० हून कमी आयसीयू बेड उरल्याचं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं होतं. केंद्र सरकारच्या रुग्णालयांतील ७००० बेड कोव्हिड रुग्णांसाठी रिझर्व्ह करण्याची मागणी करत अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्रंही लिहिलं आहे.
रुग्णांच्या वाढलेल्या संख्येमुळे दिल्लीमध्ये आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत. अनेक ठिकाणी बेडस उपलब्ध नाहीत तर काही ठिकाणी ऑक्सिजन वेळेवर उपलब्ध होऊ शकलेलं नाही. यामुळे दिल्ली सरकारनं एका कंट्रोल रुमचीही स्थापना केलीय. हा कंट्रोल रुम ऑक्सिजन, रेमडेसिविर पुरवठ्याच्या डाटावर नियंत्रण ठेवणार आहे. सरकारनं यासाठी एका विभागीय अधिकाऱ्याचीही नियुक्ती केली आहे.