राजकारण

कोरगाव भीमा प्रकरणी रश्मी शुक्लांची तब्बल ६ तास साक्ष

मुंबई : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर तब्बल ६ तास साक्ष नोंदवण्यात आली. यावेळी रश्मी शुक्ला यांनी आयोगासमोर पुराव्यांचे प्रतिज्ञापत्रही सादर केले. या चौकशीनंतर रश्मी शुक्ला यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

सरकारी वकील शिशिर हिरे यांनी या चौकशीबाबत माहिती देताना रश्मी शुक्ला यांनी चौकशीला पूर्ण सहकार्य केल्याचं सांगितलं. दुसरीकडे चौकशी आयोगाने तत्कालीन कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनाही चौकशीसाठी बोलावण्याचा निर्णय घेतलाय.

आजच्या चौकशीमध्ये अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने कोरेगाव भीमा चौकशी आयोगाचे वकील . आशिष सातपुते यांनी नांगरे पाटलांना चौकशी कामी साक्ष नोंदवण्यासाठी आयोगासमोर बोलवण्यासाठी आयोगासमोर अर्ज दाखल केला. ही मागणी ग्राह्य धरून मुंबईचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना चौकशीसाठी बोलविले जाणार आहे. मात्र, नेमके केव्हा हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. कोरेगाव भीमा दंगल घटनेच्या वेळी विश्वास नांगरे पाटील तत्कालीन कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे पोलीस महानिरीक्षक म्‍हणून कार्यरत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button