45 वर्षे जुना कॉम्प्युटर, किंमत फक्त 11 कोटी रुपये!

45 वर्षे जुना कॉम्प्युटर तोसुद्धा 11 कोटी रुपयांना कोण खरेदी करणार असंही तुम्ही म्हणाल. पण तुम्हाला विश्वास बसणार नाही, तर हा कॉम्प्युटर खरेदी करण्यासाठी अनेकांनी तयारी दर्शवली आहे. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल इतकं या कॉम्प्युटरमध्ये काय खास आहे. कॅलिफोर्नियाची जगप्रसिद्ध टेक कंपनी ॲपल आहे. या कंपनीचा मोबाईल आपल्याकडे असावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. या कंपनीचा मोबाईल खरेदी करण्यासाठी अनेकांनी किडनी विकण्यास ही तयारी दर्शवली आहे. याच कंपनीचा हा कॉम्प्युटर आहे.
सध्या ई-बेवर (eBay) ॲपल-1 कॉम्प्युटरची विक्री केली जात आहे. याची किंमत 1,500,000.00 म्हणजे 11 कोटींच्या आसपास आहे. ॲपलचे दिवंगत को-फाऊंडर स्टीव्ह जॉब्स यांनी हा कॉम्प्युटर तयार केला होता. स्टीव्ह जॉब्स यांनी को-फाऊंडर स्टीव्ह वॉजनिएकच्या मदतीने तयार केला होता. 1976 साली हा कॉम्प्युटर तयार करण्यात आला होता.
ई-बेवर (eBay) ॲपल-1 कॉम्प्युटरची माहिती देण्यात आली आहे. हा कॉम्प्युटर आजही चांगला आहे. eBay च्या जाहिरातीनुसार ‘ही एक दुर्मिळ संधी आहे. कारण आता फक्त सहापेक्षा कमी ओरिजनल बाइट शॉप KOA वुड केसेज राहिले आहेत. त्यामधील बहुतेक केसेज संग्रहालयात संग्रहित करण्यात आले आहेत. या केसेजमधील हा चांगल्या अवस्थेतील आहे. याला स्पेशल स्टोरेजमध्ये धूळ आणि ओलाव्यापासून सुरक्षित ठेवले आहे.’
या कॉम्प्युटरच्या मालकाने हे सुद्धा सांगितलं की, ‘तो या कॉम्प्युटरचा दुसरा मालक आहे. 1978 च्या सुरुवातीला त्यांनी हा कॉम्प्युटर त्याच्या मूळ मालकाकडून नवीन ॲपल-2 कॉम्प्युटर देऊन खरेदी केला होता.’
1976 मध्ये कंपनीने या कॉम्प्युटरला तयार केलं होतं. हे कंपनीकडून ग्राहकांना विकलं गेलेलं पहिलं प्रोडक्ट होतं. लाँच वेळी या कॉम्प्युटरची किंमत 666.66 डॉलर म्हणजेच जवळपास 48,600 रुपये इतकी होती. जर तुम्हाला हा कॉम्प्युटर खरेदी करायचा असेल तर इथं करून खरेदी करू शकता.