इतर

गुजरातमध्ये ४.५ तीव्रतेचे भूकंपाचे झटके

गांधीनगर : एकाबाजूला संपूर्ण देशभरात कोरोनाचे संकट आहे. पण दुसऱ्या बाजूला अरबी समुद्रात तोक्ते चक्रीवादळ घोंघावत आहे. या वादळाचा परिणाम महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, गोवा आणि गुजरातच्या समुद्र किनारपट्टी भागांमध्ये तीन दिवस दिसणार आहे. माहितीनुसार अतितीव्र चक्रीवादळ मुंबईला खेटून गुजरातच्या दिशेने प्रवास करत आहे. पण यादरम्यान गुजरातच्या सौराष्ट्रामध्ये आज पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के बसले.

नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, आज पहाटे या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.५ नोंदवली गेली. गुजरातमध्ये उना आणि राजुला भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. आज पहाटे ३ वाजून ३७ मिनिटांनी उनाच्या पूर्वेस ३.५ किमीच्या खोलीवर भूकंप झाला. माहितीनुसार, अद्याप कोणतीही जीवितहानी आणि नुकसान झाले नाही आहे.

दरम्यान गुजरातमध्ये समुद्र किनारपट्टी भागात आज आणि उद्या तोक्ते चक्रीवादळामुळे मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून एनडीआरफची ५० पथकं तैनात करण्यात आली आहे. गुजरातच्या कच्छमध्ये चक्रीवादळामुळे नुकसान होण्याच्या अनुषंगाने प्रशासनाने अलर्ट जारी केला आहे. मच्छिमार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

आज सकाळी चक्रीवादळ पोरबंद आणि महुवा दरम्यान गुजरातच्या समुद्र किनारपट्टीला धडकणार आहे. यामुळे राज्यातील किनारपट्टीलगत असलेल्या जिल्ह्यांमध्ये वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच जिल्ह्यांमध्ये १५० ते १६० किमी वेगाने वारे वाहू शकतात. माहितीनुसार, गुजरातमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button