नवी दिल्ली : मोदी सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठी दिवाळीची भेट दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयाचा ५० लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. केंद्राच्या बैठकीत हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर लवकरच याची अधिकृत घोषणा करतील. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ झाल्याननंतर ७ व्या वेतन आयोगानुसार, कर्मचाऱ्यांना त्यांच्या बेसिक सॅलरीवर ३१ टक्के डीए मिळेल.
या वर्षी जुलैमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने १ जुलैपासून केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांसाठी महागाई भत्ता आणि महागाई आराम (डीआर) दर ११ टक्के वाढवण्याचा निर्णय घेतला होता. यासह डीएचा नवीन दर १७ टक्क्यांवरून २८ टक्के करण्यात आला.