नवी दिल्ली : वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी आज मोदी सरकारतर्फे ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. मेडिकलच्या पदवी आणि पदव्युत्तर (MBBS / MD / MS / डिप्लोमा / BDS / MDS) अभ्यासक्रमातल्या ऑल इंडिया कोटातल्या जागांमध्ये ओबीसींसाठी २७ टक्के तर ईडब्लूएस प्रवर्गासाठी १० टक्के आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. हा निर्णय २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी लागू आहे.
या निर्णयमुळे मेडिकल तसेच डेंटल अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या ओबीसी आणि अर्थिक मागास घटकातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. या निर्णयाचा फायदा ५,५५०० होणार असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया म्हटले आहे.
अखिल भारतीय कोटा योजनेअंतर्गत (AIQ) ओबीसी आणि ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी या आरक्षणाचा फायदा घेता़ येणार आहे.
इतर मागासवर्गीय आणि ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ देण्याची सुचना केंद्र सरकारने यापूर्वीच जाहीर केली होती. यानंतर हे आरक्षण लागू करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी आढावा बैठक घेतली. अखिल भारतीय कोट्यातून ओबीसींना आरक्षण देण्याची मागणी बऱ्याच सुरु होती. त्यामुळे २६ जुलै रोजी झालेल्या आढावा बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी यावर लवकरात लवकर समाधानकारक उपाय शोधण्यासंदर्भात चर्चा केली. मात्र आज अखरे या आरक्षणावर अंतिम निर्णय जाहीर करण्यात आला. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कोट्यातील प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.