![](https://dg24.in/wp-content/uploads/2021/07/landslide-1.jpg)
मुंबई: मुंबईत कालची रात्र पावसामुळं काळरात्र ठरली आहे. चेंबूर, विक्रोळी आणि भांडूपमध्ये झालेल्या तीन दुर्घटनांमध्ये २५ जणांचा मृत्यू झाला आहे. चेंबूरमध्ये दरड कोसळून १७ जणांचा मृत्यू झाला आहे. इथं बचावकार्य अजूनही सुरु आहे. तर विक्रोळीत झोपडपट्टी कोसळून ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर भांडूपमध्येही भिंत कोसळून १६ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.
Rs. 2 lakh each from PMNRF would be given to the next of kin of those who lost their lives due to wall collapses in Mumbai. Rs. 50,000 would be given to those injured.
— PMO India (@PMOIndia) July 18, 2021
दरम्यान, मुंबईत भिंत कोसळून मृत झालेल्या व्यक्तिंच्या परिवाराला प्रत्येकी दोन लाख रुपयांच्या मदतीची घोषणा पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आली आहे. तर या घटनांमधील जखमींना ५० हजार रुपयांची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान मदत निधीतून मदत देणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. या घटनेबद्दल पंतप्रधान मोदींसह गृहमंत्री अमित शाह यांनी शोक व्यक्त केला आहे. मुंबईतील चेंबूर आणि विक्रोळी येथे भिंत कोसळल्याने झालेल्या जीवितहानीची घटना पाहून व्यथित झालो आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या परिवारासोबत माझ्या संवेदना प्रकट करत आहे. जखमी झालेल्या व्यक्तिंच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधार व्हावा ही प्रार्थना करतो, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.
मुंबई के चेंबूर में हुए हादसे की हृदयविदारक
सूचना से स्तब्ध हूँ। इस हादसे में जिन लोगों ने अपनों को खोया है उनकी इस अपूरणीय क्षति पर गहरी संवेदनाएं व्यक्त करता हूँ। ईश्वर शोक संतप्त परिजनों को यह दुःख सहने की शक्ति प्रदान करें।— Amit Shah (@AmitShah) July 18, 2021
चेंबूरमधील घटनेबाबत देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देखील या घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, घटनेबाबत ऐकून स्तब्ध झालो आहे. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या परिजनांना गमावलं आहे, त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो. ईश्वर त्यांना संकटातून सावरण्याची शक्ती देवो, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.