Top Newsराजकारण

२५ जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल; ११ जिल्ह्यांमध्ये लेव्हल तीनचे नियम कायम : राजेश टोपे

मुंबई : राज्यातील २५ जिल्ह्यांतील निर्बंधांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. तसेच ११ जिल्ह्यांमध्ये लेव्हल तीनचे नियम कायम राहणार असून या ठिकाणी निर्बंध कायम राहणार आहेत, अशी घोषणा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली.

राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना ही घोषणा केली. टास्क फोर्सची मिटींग पार पडली. त्यात २५ जिल्ह्यांतील कोरोनाची परिस्थिती राज्याच्या सरासरीपेक्षा कमी आहे. तिथं सर्व निर्बंधांचे शिथिलीकरण करण्याचा निर्णय झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे याची फाईल जाईल. त्यावर ते सही करतील. त्यानंतर एक दोन दिवसात ही शिथिलता देण्यात येणार आहे, असं टोपे यांनी सांगितलं.

राज्यातील दुकांनाच्या वेळेत बदल होऊ शकतात. तसेच विकेंडलाही दिलासा मिळण्याची शक्यता असल्याचे संकेत राजेश टोपे यांनी दिले आहेत. टोपे म्हणाले की, ‘राज्यात शनिवार, रविवार दुकाने पूर्णपणे बंद होती. त्यात बदल करून शनिवारी दुकाने ३ ते ४ वाजेपर्यंत चालू ठेवता येऊ शकतात. तसेच आठवड्याला (सोमवार ते शुक्रवार) दुकाने ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली होती त्यात वाढ करून रात्री ९ वाजेपर्यंत सुरू करता येऊ शकतात. रेस्टॉरंट, चित्रपटगृह, सलून, जिम हे ५० टक्के सुरू करता येईल. पण अशा ठिकाणी एसी नको, खेळती हवा असली पाहिजे. तसेच खासगी ऑफिस ५० टक्के सुरू करायला पाहिजे. रेस्टॉरंटमध्ये दोन डोस घेतलेल्यांना प्रवेश देण्यास काही हरकत नाही.

अकरा जिल्ह्यांत निर्बंध कायम

राज्यातील अकरा जिल्ह्यांतील कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. ही परिस्थिती अजून निवळलेली नाही. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, कोकणात रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, मराठवाड्यात बीड आणि उत्तर महाराष्ट्रातील नगरमध्ये निर्बंध कायम राहतील. हे अकरा जिल्हे लेव्हल तीनमध्येच राहणार आहेत, असं त्यांनी सांगितलं.

लोकल सुरू करण्याचा निर्णय दोन दिवसात

सिनेमा गृह आणि मॉल मधील कर्मचारी यांच लसीकरण पूर्णपणे करून चालू ठेवण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. रेल्वे विभागाशी चर्चा करून लोकल सुरू करण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील असं टोपे यांनी सांगितलं. लोकल प्रवासाबाबत पुढील एक ते दोन दिवसांत निर्णय येण्याची शक्यता आहे, असंही ते म्हणाले.

या जिल्ह्यांत होणार निर्बंध शिथिल

मराठवाडा: परभणी, लातूर, जालना, नांदेड, हिंगोली, औरंगाबाद, उस्मानाबाद

विदर्भ: अमरावती, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, बुलढाणा, भंडारा. यवतमाळ, वर्धा, वाशीम, हिंगोली

कोकण: रायगड, ठाणे, मुबई

उत्तर महाराष्ट्र: जळगांव, धुळे, नंदुरबार, नाशिक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button