मुंबई – अमेझॉन प्राईम व्हिडीओ ने आपल्या आगामी ओरिजिनल सिरीजची घोषणा केली. सिरीजचे नाव अद्याप ठरलेले नसून अभिनेता शाहीद कपूर यामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. राज निदिमोरू आणि कृष्णा डीके यांनी या गोंधळ नाटक थ्रिलर सिरीजची निर्मिती केलेली असून त्यामध्ये शाहीद कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. गडद आणि प्रहसनात्मक विनोदनिर्मितीकरता प्रसिद्ध असलेल्या राज आणि डीके यांच्या ‘ द फॅमिली मॅन’ या जवळजवळ २४० पेक्षा अधिक देशांमध्ये प्रचंड लोकप्रिय झालेल्या सिरीजच्या अभूतपूर्व यशानंतर या जोडीच्या निर्मितीतून साकारलेले हे आगामी आकर्षण आहे. सीता. आर. मेनन, सुमन कुमार आणि हुसेन दलाल हे या शोचे सहलेखक आहेत.
“भारतातील व संपूर्ण जगभरातील काही कुशल कथाकारांना आम्ही अमेझॉन प्राईम व्हिडीओमार्फत त्यांचे हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देऊ शकतो याचा आम्हाला अभिमान आहे.शाहीद कपूर हा सर्वगुणसंपन्न कलाकार आहे, आणि राज व डीके यांच्या निर्मितीतून साकारलेल्या नाविन्यपूर्ण कलाकृतीद्वारे तो अमेझॉन प्राईम व्हिडीओ कुटुंबाचा एक भाग होतो आहे याचा आंम्हाला आनंद आहे. ही अद्वितीय अशी भट्टी जमून आली आहे आणि या कलाकृतीला आमचे ग्राहक नक्कीच डोक्यावर घेतील अशी आम्हाला खात्री आहे.” असे अमेझॉन प्राईम व्हिडीओ, भारत चे कंटेंट विभागाचे मुख्य संचालक विजय सुब्रमण्यम म्हणाले.
आपल्या डिजिटल व्यासपीठावरील आगमनाबाबत बोलताना शाहीद कापूर म्हणाला, “मला राज आणि डीके यांच्यासमवेत काम करण्याची अत्यंत मनापासून इच्छा होती, अमेझॉन प्राईम व्हिडीओ वरील ‘द फॅमिली मॅन’ हा माझा सर्वात आवडता भारतीय कार्यक्रम आहे. माझ्या डिजिटल व्यासपीठावरील पदार्पणासाठी मला त्यांच्याइतके योग्य दुसरे कोणीही वाटले नाही.अमेझॉन प्राईम व्हिडीओ ही सर्वोत्तम ग्राहक सेवा आहे आणि त्यांच्यासोबत काम करायला मिळते आहे याबाबत मी स्वत:ला भाग्यवान समजतो. मी जेव्हा पहिल्यांदा ही कथासंकल्पना ऐकली तेव्हाच ती मला अतिशय भावली होती.तेव्हापासून आतापर्यंतचा आमचा एकत्रित प्रवास खरोखरच रोमांचकारी आहे. ही कलाकृती प्रेक्षकांच्या हाती सुपूर्द करण्यास मी आतुर आहे.”
राज आणि डीके ही निर्माती जोडी म्हणाली, “आम्ही करतो त्या प्रत्येक कलाकृतीमध्ये आमच्याच पूर्वीच्या कालाकृतीपेक्षा उत्तम काहीतरी देणे हेच आमच्यासमोरील आव्हान असते.ही आमची सर्वात आवडती संहिता आहे. या अत्यंत प्रेमाने तयार केलेल्या संहितेसाठी आम्हाला शाहीद हा एकमेव अभिनेता परिपूर्ण वाटला. या सिरीजसाठी शाहीद आमची सुरुवातीपासूनची एकमेव निवड होता. आम्ही लगेच त्याच्याशी संपर्क साधला आणि त्याच्याशी या प्रकल्पाविषयी पहिल्यांदा बोललो तेव्हापासून आजपर्यंत आमचे सूर तंतोतंत जुळले आहेत. शाहीदला पाहणे आणि त्याच्यासह काम करणे ही नेहमीच आनंदाची बाब असते. तो ज्या आत्मीयतेने भूमिका साकारतो ते पाहणे विलोभनीय असते. अमेझॉन प्राईम व्हिडीओशी आमचे जुने बंध आहेत. त्यांच्यासाठी प्रत्येक वेळी काम करताना आम्हाला अधिक जबाबदारी वाटत असते. ते अतिशय उत्तम भागीदार आहेत. ही सिरीज तयार करण्यास आम्ही उत्सुक आहोत!”
या सिरीजमधील इतर कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात असली तरीही ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे.
भारतीय चित्रपट सुराराय पत्रू, वी, सी यू सून,निशब्दम, हलाल प्रेमकथा,मिडलक्लास मेलडीज, मारा, भीमसेना नालामहाराजा, मेन नं. १३,पेंग्विन, लॉ, सुफियुम सुजातायुम, पोनमंगल वांधलं, फ्रेंच बिर्याणी, गुलाबो सिताबो, शकुंतलादेवी, कुली नं १, दुर्गामाती, छलांग यांच्याबरोबरच प्राईम व्हिडीओ कॅटलॉगच्या यादीत आता या नव्या सिरीजचे आगमन होणार आहे. अमेझॉन प्राईम ने स्वत: निर्मिलेल्या बंदिश बँडीट्स, तांडव, ब्रीथ:इंटू द शॅडोज, पाताळ लोक, द फरगॉटन आर्मी-आझादी के लिये, फोर मोअर शॉट्स प्लीज- सीजन१ आणि २, इनसाईड एज सीझन १ आणि २, मेड इन हेवन, आणि बोरात सारखा चित्रपट समीक्षकांनी गौरवलेला, अनेक पुरस्कारप्राप्त अमेझॉन प्राईम ची निर्मिती असलेला चित्रपट, टॉम क्लॅन्सीचा जॅक रेयान, द बॉईज, हंटर्स, फ्लीबॅग, आणि द मार्व्हलस मिसेस. मैसी हे सर्व चित्रपट अमेझॉन प्राईमच्या सदस्यांना कुठल्याही अतिरिक्त शुल्काशिवाय पाहता येतात.हिंदी, मराठी,गुजराती, तमिळ, तेलुगु, कन्नड, मल्याळम, पंजाबी आणि बंगाली या भाषेतील चित्रपट येथे पाहता येतात.