ओंजळी आणि चोळी या दोन कवितासंग्रहाचे प्रकाशन
पंचफुला प्रकाशनातर्फे औरंगाबाद येथे कवयित्री सौ.जनाबाई प्रकाश जाधव यांच्या ओंजळी आणि चोळी या दोन कवितासंग्रहाचे प्रकाशन जेष्ठ कवि, लेखक, गीतकार प्रा. प्रवीण दवणे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर प्रसंगी प्रकाशक डाँ.बालाजी जाधव, श्री देवराव कमानदार, प्रशांत डिंगणकर, नितीन सावंत, सौ. जनाबाई जाधव आणि बाळा कांदळकर व्यासपीठावर उपस्थित होते. पत्रकार विनोद जगदाळे अँड. सुर्दशना जगदाळे, जनाबाई यांचे यजमान श्री प्रकाश जाधव, पुत्र विनोद जाधव, रोशना डिंगणकर, स्मिता कांदळकर अनेक मान्यवर मंडळी या कार्यक्रमास उपस्थित होती. जनाबाई जाधव यांच्या दोन्ही संग्रहातील कविता अनेक विषयांना स्पर्शून गेल्या असून रसिक वाचकांना त्या नक्कीच भावतील! यातील अनेक ग्रामीण शब्द आपल्या ज्ञानात भर घालतील हे विशेष ! या दोन्ही कविता संग्रहांना जेष्ठ कवि, कादंबरीकार, डाँ. महेश केळुस्कर यांच्या प्रस्तावना लाभल्या हे या कवितासंग्रहाचे वैशिष्ट्य होय.