हॅटसन अॅग्रो प्रॉडक्ट लिमिटेड (एचएपी) च्या महाराष्ट्रातील प्रकल्पात उत्पादन सुरू
सोलापूरमध्ये ७२ एकर जमिनीवर १३० कोटींचा स्वयंचलित दुग्ध प्रकल्प
मुंबई : ‘आरोक्या’, ‘हॅटसन’, ‘अरुण आईसक्रीम्स’, ‘इबॅको’ या ब्रँडसह भारतातील खाजगी क्षेत्रातील आघाडीची डेअरी कंपनी हॅटसन अॅग्रो प्रॉडक्ट लिमिटेड (एचएपी) ने महाराष्ट्रातील सोलापुरात नव्याने स्थापित ग्रीनफिल्ड दुग्ध प्रक्रिया प्रकल्पात व्यावसायिक उत्पादनाची घोषणा केली.
तामिळनाडू, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये प्रकल्पांचे जाळे असलेल्या एचएपीचा हा १९ वा निर्मिती प्रकल्प आहे. संपूर्णपणे स्वयंचलित डेअरी प्लांट, देशातील तंत्रज्ञानदृष्ट्या श्रेष्ठ असा हा प्रकल्प महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात १३० कोटी खर्च करून ७२ एकर जागेवर उभारला गेला आहे. हा प्लांट नवीनतम डिझाइन तत्त्वज्ञान अनुसरण करतो आणि दररोज ६ लाख लिटर दुधावर प्रक्रिया करण्यासाठी जर्मनीकडून आयात केलेली विशेष उपकरणे (एलएलपीडी) या प्रकल्पामध्ये आहेत. प्रकल्पाच्या डिझाइनचा जोर कर्मचारी सुरक्षा, उत्पादनाची स्वच्छता आणि उत्कृष्ट गुणवत्तेची उत्पादने बनविणे यावर आहे. एचएपीने पावसाच्या पाण्याचा साठा करण्यासाठी प्रकल्पाच्या आवारात १.२५ कोटी लिटर क्षमतेचा तलाव तयार केला आहे. या क्षेत्रातील हे असे पहिले स्थान आहे जेथे जतन केलेल्या पाण्यावर संपूर्ण प्रक्रिया केली जाऊ शकते आणि त्या पाण्याचा एकाधिक हेतूंसाठी उपयोग केला जाऊ शकतो. हॅटसन अॅग्रो प्रॉडक्ट्स लिमिटेड या नवीन प्रकल्पामध्ये दूध, दही, बटर मिल्क, चास, लस्सी, दही आणि श्रीखंडची निर्मिती करणार आहे. एचएपी त्यांची प्रतिष्ठित घरगुती ब्रँड नावे – ‘आरोक्या’ आणि ‘हॅट्सन’ अंतर्गत बाजारात आणेल.
एचएपीच्या ५ राज्यांमधील सर्व निर्मिती प्रकल्पांची एकूण दूध प्रक्रिया करण्याची क्षमता ५२.५० एलएलपीडी इतकी आहे. एचएपी सोलापूरमधील या प्रकल्पामध्ये निरनिराळ्या उत्पादनांची निर्मिती करण्याचा विचार करीत असून राज्यात ३००० हून अधिक प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करुन देईल. या व्यतिरिक्त, हा प्रकल्प स्थापित केल्यामुळे दुग्ध व्यावसायिकांना मुख्य प्रवाहाच्या नेटवर्कबरोबर जोडण्यास मदत होईल आणि महाराष्ट्रातील ७५००० ते ९०००० दुग्ध उत्पादकांच्या उत्पन्नास चालना मिळेल. शेतकऱ्यांना उत्तम तंत्रज्ञान, शेती साधने, पशुसंवर्धन सेवा, विशेष पशुखाद्य आणि त्यांच्या दुधाच्या पुरवठ्यासाठी त्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा व्हावी हे एचपीचे मुख्य उद्दिष्ट आहे.
यावर बोलतांना हॅट्सन अॅग्रो प्रॉडक्ट लिमिटेड चे अध्यक्ष आर.जी. चंद्रमोहन म्हणाले, “महाराष्ट्र राज्यात उत्पादन सुरू झाल्याने एचएपी आनंदी आहे. महाराष्ट्र हे एक अष्टपैलू राज्य आहे जे दुग्ध उद्योगासाठी उत्कृष्ट विकासाची संधी देते आणि एचएपीने आपला पाया बळकट करण्यासाठी व पश्चिम भागात पुढील विकासाचे प्रवेशद्वार उपलब्ध करुन देण्यासाठी हा प्रकल्प उभारला आहे. एचएपीची शक्ती ही दर्जेदार उत्पादने आहेत ज्यांवर कोट्यवधी भारतीय परिवार विश्वास ठेवतात. आम्हाला दुग्धजन्य पदार्थांची भरीव मागणी दिसत आहे आणि आम्ही आमचे दर्जेदार दुग्धजन्य पदार्थ महाराष्ट्रातील लाखो घरात आणल्याबद्दल आम्हाला आनंद झाला आहे. ऑटोमेशन, गुणवत्ता आणि स्वच्छता मानकांच्या बाबतीत एचएपी नेहमीच पुढे राहते आणि दुगधजन्य उत्पादनांसाठी नेहमीच नवीन बेंचमार्क ठरवते.”