फोकससाहित्य-कला

हम तो सात रंग है…

‘सत्ते पे सत्तामधील हम तो सात रंग है, ये जहाँ रंगी बनाएंगे..’ या गाण्यातील आशयाला साजेसे काम दक्षिण कोरियातील जगप्रसिद्ध के-पॉप ग्रुप  ‘बीटीएस करीत आहे. या ग्रुपमधील सात कलाकार आपल्या सातत्यपूर्ण सादरीकरणाने आजच्या घडीला जगभरातील तरुणाईचे ताईत बनले आहेत. भारतीय तरुणही याला अपवाद नाहीत. कोरोना काळात सकारात्मकतेचा संदेश देण्याची बात असो वा पदवीदान सोहळ्याचे जागतिक संभाषण असो या सात युवा कलाकारांची वर्णी जागतिक संस्थांनी मान्य केली आहे. हेच त्यांच्या यशाचे मोठे गमक मानावे लागेल

जगभरातील कलाकारांची तुलना करताना युवा जगतातला एक मोठा विरोधाभास दिसून येतो. ऐन कोरोनाकाळात, तमाम भारतीय युवकांची सपनों की रानी दीपिका पादूकोनसह सात सिनेतारका अमली पदार्थांचे सेवन केल्याप्रकरणी चौकशीच्या फेºयात अडकलेल्या दिसल्या. अगदी त्याच दिवशी भारतीय वेळेनुसार सायंकाळी सहा वाजता दक्षिण कोरियन के-पॉप संगीत समूह बीटीएसचे सात युवा कलाकार संयुक्त राष्ट्रात (यूएन जनरल असेंब्ली) आमंत्रित केले गेले होते. जगभरात अब्जावधी रसिकांना ज्यांची भुरळ पडली आहे, अशा या कलाकारांना संयुक्त राष्ट्राकडून निमंत्रित करण्याची ही अलिकडच्या काळातील दुसरी घटना होती. लॉकडाऊनच्या काळात अमेरिकेतील पदवीधारकांना आयुष्याच्या मार्गावर मार्गदर्शन करण्यासाठीही या सात कलाकारांना खास आमंत्रण देण्यात आले होते.  ‘ग्रॅज्यूएट डेज सेलिब्रेशन’मध्ये गुगलच्या सुंदर पिचईसह जगभरातील नामवंत प्रेरणास्त्रोत आमंत्रित होते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही या कलाकारांच्या युनिटी आणि मैत्रभावाचे कौतुक केले होते. 2020मध्ये  कोरोनामुळे पहिल्यांदाच व्हर्च्युअली पार पडलेल्या ७५ व्या यूएन जनरली असेंब्लीत ग्लोबल हेल्थ सिक्युरिटी, यूनिसेफ आदी जागतिक संस्थांच्या पुढाकाराने कोरोना संक्रमणाच्या काळात सकारात्मकदृष्टीने पाहण्याचा वैश्विक सल्ला देण्यासाठी या सात कलाकारांना आमंत्रित करण्यात आले होते.
के-पॉप बीटीएस ग्रुपचा प्रमुख कलाकार आरएमने,  ‘कधीही लढणे थांबवू नका, नैराश्य, भीती आणि नकारात्मकतेवर मात करा तरच तुम्ही स्वत:चे हिरो ठराल, नेव्हर गिव्ह अप अशी भावनिक साद घातली. तर या ग्रुपमधील इतर कलाकारांनी,  ‘गडद काळ्या रात्रीतच तारे अधिक प्रकाशित दिसतात, अधिक चांगल्या पद्धतीने चमकतात, कोरोना काळ जरी एकटेपणाचा, अचंबित करणारा, भीतीदायक असला तरी आपल्या आयुष्यात फारसे काही बदललेले नाही, हा विश्वास स्वत:ला द्या ’, असे आवाहन केले. जेमतेम २१ ते २७ वयोगटातील हे सात कलाकार आजच्या घडीला जगभरातील अब्जावधी तरुणांच्या गळयातील ताईत बनले आहेत, ते त्यांच्या कठोर मेहनतीने आणि कलेच्या सादरीकरणातील सातत्याने.
२०१३ पासून के पॉप दुनियेत चमकणारे आरएम, व्ही, जीन, सुगा, जे होप, जिमिन, जंगकुक या कलाकारांनी भारतातही मोठ्या प्रमाणात चाहते निर्माण केले आहेत. त्यांनी २०१८ पासून २०१९ या एका वर्षात केलेल्या जगभरातील संगीत दौºयावर आधारित एक लघूपट २०१९ मध्ये भारतात मुंबईसह मोजक्या १०० मल्टीफ्लेक्समध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. या जेमतेम दोन तासाच्या शोसाठी अवघी तरुणाई लोटली होती. दक्षिण कोरियातील या सात कलाकारांनी संगीत क्षेत्रात अशाप्रकारे जगभरात स्वत:चे स्थान निर्माण केले आहे.
लॉकडाऊनच्या काळातही त्यांनी उपलब्ध संधीचे सोने करुन डिजीटल प्लॅटफॉर्मवरून जगभरातील  ‘बीटीएस आर्मी’ अर्थातच बीटीएसच्या चाहत्यांना के-पॉप संगिताची भेट दिली. लॉकडाऊनच्या काळात बीटीएसच्या एक से एक परफॉर्ममन्सने आजवरची युट्यूब असो वा सोशल मीडिया सर्वांची जागतिक रेकॉर्डस तोडली आहेत. कोरोना काळात भारतातील हिरो असणारे अनेक कलाकार ड्रग्जच्या आहारी जात आपल्यातील नैराश्येवर मात करण्यात दंग होते, तर हे हरहुन्नरी के-पॉप कलाकार आपल्यासोबतच आपल्या चाहत्यांचा एकटेपणा, नैराश्य कसे दूर करु शकू याचा प्रयत्न करीत होते. गत वर्षभरातील त्यांच्या प्रत्येक लाईव्ह इव्हेंटला अब्जावधींची पोचपावती मिळाली आहे. म्हणूनच लॉकडाऊनमध्येही ते जगभरातील सर्वाधिक कमाई करणारे कलाकार ठरले. या कलाकारांच्या या यशाबद्दल थेट दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. विशेष म्हणजे वयाच्या २८ व्या वर्षापर्यंत दोन वर्षे कोरियन सैन्यात जाण्याच्या नियमालाही ते अपवाद राहिले आहे. कोरीयन लॉमध्ये पहिल्यांदाच सुधारणा करण्यात आल्या असून केवळ या कलाकारांपुरते दोन वर्षे सैन्यात जाण्याच्या नियमांत शिथिलता देण्यात आली आहे.
बीटीएस आर्मी अर्थातच बीटीएस चाहत्यांकडून भारतासह जगभरातील विविध आपदग्रस्त भागाला आर्थिक सहायताही केली जाते. खुद्द या सात कलाकारांनी कोव्हिड-१९ उपचारांसाठी कोट्यवधींची देणगी यूनिसेफ आणि जागतिक आरोग्य संघटनेला देवू केली आहे. दक्षिण कोरियातील पर्यटनात या कलाकारांचा आणि के पॉप इंटस्ट्रीजचा जवळपास ७० टक्के वाटा मानला जातो, यातच त्यांचे यश आणि मान्यता दिसून येते.
खºया अर्थाने कलाकार आणि एक माणूस म्हणूनही आयडॉल असणाºया या कलाकारांच्या यादीत भारतीय कलाकार कधी पोहोचू शकतील, माहीत नाही. भारतीय सिनेसृष्टीला अपार मेहनत आणि दूरदृष्टी असणारे अनेक दिग्ग्ज गॉडफादर, कलाकार लाभले, पण त्यांच्या दूरदृष्टीला साजेशी सिनेसृष्टी आता अमली पदार्थांच्या विळख्यात अडकल्याने आपली वैभवशाली परंपरा, ऐतिहासिक महत्व गमावते की काय अशी भीती वाटू लागली आहे.
या अस्वस्थ वातावरणात सातत्याने  ‘मेक इट राईट’ म्हणत  ‘यू कान्ट स्टॉप मी लव्हींग मायसेल्फ’ किंवा  ‘स्प्रिंग विल कम अगेन’ अशा आशयपूर्ण गाण्यांतून जगाला सकारात्मकता देणाºया या कलाकारांची दखल घ्यायलाच हवी. कोरोना काळात जागतिक संगीत दुनियेत या कोरीयन के पॉप कलाकारांनी आपलं स्थान जागतिक क्रमवारीत अव्वल ठेवलं.
अवघं जग कोरोना महामारीत स्वत:ला सुरक्षित ठेवण्यात व्यग्र होतं. जगभरातील मनोरंजन क्षेत्राला टाळं लागलं होतं. महाराष्टÑात आणि भारतात अनेक मालिका, सिनेकलाकारांनी या काळातील आर्थिक विषमतेमुळे आत्महत्या केल्या, तर काहींना आत्महत्येस प्रवृत्त केलं गेलं. बॉलिवूडसह अनेक राज्यातील सिनेजगताला अमली पदार्थाचा विळखा पडला आहे, यातून कलाकार स्वत:ला सावरु शकत नव्हते. अशाच अस्वस्थ वातावरणात तंत्रज्ञानात कायमच अव्वल ठरलेल्या कोरीयन के पॉप कलाकारांनी आपल्या सप्तसुरांची बरसात आपल्या चाहत्यांसाठी टिकवून ठेवली. ‘नेव्हर गिव्ह अप’ असा संदेश देत संकटावर मात करा, सातत्याने संवाद साधत राहा, आपल्या कुटूंबियाशी जोडलेले रहा असा संदेश देत ‘बीटीएस’च्या या सात तरुण कलाकारांनी जगभरातल्या तरुणाईला जिवंत ठेवलं असं म्हटलं तर वावगं ठरु नये.
‘कोणतेच संकट संगीत थांबवू शकत नाही. संकटावर मात करण्याची तुमच्यातील क्षमता रोखू शकत नाही. तुमच्यातील कल्पकता, नवनिर्मितीचा ध्यास, गतीचा आग्रह, कष्टातील सातत्य तुम्हाला यशाच्या मार्गावरच नेते’. हाच संदेश या कलाकारांनी आपल्या संगितातून जगाला दिला आहे. भारतीय कलाकारांपेक्ष ‘बीटीएस’चे हे सात कलाकार उजवे वाटण्याचे माझ्यालेखी महत्वाचे कारण म्हणजे यांनी आपली कला स्वतापुरती मर्यादित न ठेवता आपल्या आसपास असणाºयांना अनेकांना यातून रोजगाराची, नवनिर्मितीची संधी देवु केली आहे. भारतातील अनेक नामवंत कलाकार, खेळांडूनी खूप यश मिळवलं, अगदी भारतरत्नही मिळवले पण ते सर्वकाही त्यांनी स्वतापुरतेच ठेवले, स्वतापलीकडे त्यांनी कोणालाही मोठे होवू दिले नाही, हा इतिहास आहे. याच कारणाने ‘टिमवर्क मेक्स द ड्रिम वर्क’ या तत्वावर कार्यरत असणारे हे सप्त कलाकार अधिक भावतात.

  • – अ‍ॅड. योगिनी बाबर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button