नवी दिल्ली – गुजरातमधील जगातील सर्वात मोठ्या आणि अत्यधुनिक क्रिकेट स्टेडियमच्या नावावरून वाद सुरू आहे. यासंदर्भात आता राहुल गांधींनीही भाष्य केले आहे. यामुळे या वादाला आणखीनच हवा मिळताना दिसत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या सस्ते बुधवारी जगातील सर्वात मोठ्या आणि अत्यधुनिक क्रिकेट स्टेडियमचे उद्घघाटन करण्यात आले. आता याचे नाव सरदार पटेल स्टेडियमऐवजी नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनीच गुजरातचे मुख्यमंत्री असताना या स्टेडियमची संकल्पना तयार केली होती.
यासंदर्भात, राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे, की “सत्य किती चांगल्या प्रकारे समोर येते. नरेंद्र मोदी स्टेडियम – अडानी अँड – रिलायन्स अँड जय शाह यांच्या अध्यक्षतेखाली! #HumDoHumareDo.” पंडित नेहरूंचा ‘भारतरत्न’ सन्मान ते क्रिकेट स्टेडियमला नरेंद्र मोदींचं नाव… परंपरा To Be Continued!
सच कितनी खूबी से सामने आता है।
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ज्या स्टेडियमचे उद्घाटन करण्यात आले, त्या स्टेडियमला आधी सरदार पटेलांचे नाव देण्यात आले होते. मात्र, आता या स्टेडियमचे नाव पंतप्रधानांच्या नावाने, नरेंद्र मोदी स्टेडियम करण्यात आले आहे. यामुळेच काँग्रेसने भाजप आणि पंतप्रधानांना निशाण्याव घेतले आहे.
काँग्रेस नेते याला सरदार पटेलांचा अपमान असल्याचे म्हणत आहेत, तर केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी यासंदर्भात बोलताना म्हटले आहे, की “आम्ही या स्टेडियमचे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हा मोदींचा एक ड्रिम प्रोजेक्ट होता. गुजरातचे मुख्यमंत्रीपद भूषवत असताना त्यांनी हे स्पप्न पाहिले होते. जे आता साकार झाले आहे. नवे स्टेडियमला जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात हायटेक स्टेडियमच्या धर्तीवर उभारण्यात आले आहे. अहमदाबाद आता स्पोर्ट्स सिटीच्या नावानेही ओळखले जाईल.”
मोटेराच्या नवनिर्मित स्टेडियममध्ये खेळाडूंसाठी तब्बल चार ड्रेसिंग रूम आहेत. याशिवाय एलईडी लाईट्सचा वापर करण्यात आल्याने चेंडूवर नजर स्थिरावणे खेळाडूंना सोपे जाणार आहे. रात्रीच्यावेळीही खेळाडू हवेत आणि आकाशात चेंडू सहजपणे पाहू शकतील. जगातील सर्वांत मोठ्या स्टेडियममध्ये तब्बल ११ मध्यवर्ती खेळपट्ट्या आहेत. याशिवाय जिमसह चार ड्रेसिंग रूम्स आहेत.