शेअर बाजाराचे साम्राज्य
मागील आठवड्यात शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात हालचाल झाली. मी माझ्या मागील लेखात शेअर बाजारात खरेदीसाठी वेट अँड वॉच सांगितले होते. निर्देशांक मंदीत येत आहेत. त्यामूळे पुढील आठवडयात देखील सावधानता बाळगणे आवश्यक आहे. सध्या शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ उतार होत आहेत ते पाहता गुंतवणूक करताना स्टॉपलॉस तंत्राचा वापर करणे आवश्यक आहे. तसेच निर्देशांकात होणारी मोठी हालचाल बघता ऑप्शन मार्केटमध्ये देखील खरेदी करता येईल.
शेअर बाजारात मागील आठवड्यात पेज इंड्ट्रीज, एचओव्ही, आयसीआरए यांनी चमकदार कामगिरी केली. अल्पमुदतीचा विचार करता विंड मशीन, ग्रासिम, टाटा स्टील यासह अनेक शेअर्सची दिशा ही अल्प तसेच मध्यम मुदतीसाठी तेजीची आहे. मागील आठवड्यानंतर अल्पमुदतीसाठी निर्देशांकाची दिशा ही मंदीची झालेली असून निर्देशांकाची गती पण मंदीची झालेली आहे. अल्पमुदतीसाठी निर्देशांक सेन्सेक्सची 48580 आणि निफ्टीची 14350 ही महत्वाची आधार पातळी आहे. शेअर्समध्ये व्यवहार करीत असताना निर्देशांकाच्या वरील पातळ्या लक्षात ठेवूनच शेअर्समध्ये गुंतवणूक करणे आवश्यक आहे. गेल्या काही आठवड्यांपासून मध्यम मुदतीच्या चार्टनुसार निर्देशांक सेन्सेक्स 52520 ते 48890 आणि निफ्टी 15450 ते 14450 इतक्या मोठ्या रेंज मध्ये अडकलेला आहे.
आपण मागील लेखात सांगिल्याप्रमाणे निर्देशांक हे यापूर्वीच मंदीत आलेले होते आपण सेन्सेक्सने 50900 आणि निफ्टीने 14900 या पातळ्यांच्या खाली आहेत तोपर्यंत शेअर बाजारात मोठी तेजी येणार नाही हे सांगितले होते. त्याप्रमाणे या आठवड्यात निफ्टीने 14878 हा उच्चांक नोंदविला. आपण सांगितलेली पातळी 14900 ही तोडली नाही. कमोडीटी मार्केटचा विचार करीता सोने या धातूची दिशा ही मध्यम मुदतीसाठी मंदीची असून सोने या धातूची 47000 ही अत्यंत महत्वाची पातळी असून जोपर्यंत सोने बंद पद्धतीने ही पातळी तोडत नाही तोपर्यंत सोन्यामध्ये मोठी वाढ होणार नाही. त्याचप्रमाणे चांदीची 68500 ही महत्वाची विक्रीची पातळी असून जोपर्यंत ही पातळी चांदी तोडत नाही तोपर्यंत चांदीची दिशा मंदीचीच राहील.
EMAIL ID – samrajyainvestments@gmail.com
WEB – www. samrajyainvestments.com
(सुचना: लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाईकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही)