अर्थ-उद्योग

वुमन्स डे निमित्त ‘ऑटो आय केअर’ ॲपची #borntodrive मोहीम

१ ते ३१ मार्च दरम्यान महिलांना फ्री ‘रोड साईड असिस्टन्स’.

मुंबई : प्रत्येक महिलेने आत्मविश्वासाने आणि निर्धास्तपणे वाहन चालवावे, आपल्या आवडत्या क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करावे…या संकप्लनेला प्रोत्साहित करण्यासाठी मुंबईस्थित ‘ऑटो आय केअर’ मोबाईल ॲपने पुढाकार घेतला आहे. ८ मार्च २०२१ रोजी असणाऱ्या ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’चे औचित्य साधत या यंत्रणेने महिलांसाठी #borntodrive हि मोहीम सुरु केली आहे. या मोहीमेअंतर्गत १ ते ३१ मार्च दरम्यान महिला वाहनचालकांना फ्री रोड साईड असिस्टन्स देण्यात येईल. ‘तब्बल ८०% महिलांच्या टीमसोबत या ॲपची हायटेक यंत्रणा यशस्वीपणे चालत आहे. या टीममध्ये २० ते ३० वयोगटातील तरुणींचा समावेश असून ऑटोमोबाईल क्षेत्रात करिअर घडवू पाहणाऱ्या महिलांच्या स्वप्नांना पाठबळ मिळत” असल्याचा आनंद ॲपचे संस्थापक सागर जोशी यांनी व्यक्त केला.

‘ऑटो आय केअर’ ॲपच्या माध्यमातून वाहनचालकांना एका क्लिकवर मेकॅनिक मिळविण्यापासून ते ड्रायव्हर हायर करण्यापर्यंत अनेक सुविधा 24×7 उपलब्ध होतात. शहरातील रस्ते, महामार्गांवरील वाहनचालकांकडून मागितली जाणारी मदत, शंकाचे निरसन हाताळण्यासाठी महिलांची विशेष कॉल सेंटरची टीम कार्यरत आहे. वाहनचालकांच्या तात्काळ मदतीसाठी जवळील गॅरेज किंवा मॅकेनिकची सेवा पुरविली जावी यासाठी ही टिम तत्परतेने काम करत असते. देशभरातून दिवसाला वाहनचालकांचे हजारहून अधिक कॉल्स येतात. प्रत्येक कॉल यशस्वीपणे हाताळण्याची कसब या टीममध्ये पहायला मिळते. ”महिला वाहन चालवू शकत नाही ही विचारसरणी बदलणे काळाची गरज आहे. याच विचारसरणीला बदलण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून प्रत्येक महिलेने आत्मविश्वासाने वाहन चालवावे यासाठी आम्ही #borntodrive मोहीम राबवत आहोत.” असे सागर जोशी म्हणाले. १ महिन्याच्या फ्री रोड साईड असिस्टन्समध्ये बॅटरी जम्पस्टार्ट, टायर पंक्चर, टोईंग, कि लॉक आदी तांत्रिक समस्यांचे निवारण करण्यात येईल.

महिलांना वाहन चालवताना काही तांत्रिक समस्या आलीच, तर त्यांच्या तात्काळ सेवेसाठी तज्ञाची टीम नेहमीच तत्पर राहील. ”प्रत्येक वाहनचालकांच्या तांत्रिक समस्यांचे निवारण २० मिनिटांत करावे हा आमचा मुख्य उद्देश आहे. जेणेकरून त्यांचा प्रवास सुरक्षित आणि सुरळीत होईल. ऑटोमोबाईल हे क्षेत्र माझ्यासाठी केवळ करिअर नाही तर माझी एक पॅशन आहे. माझी हीच आवड टीममधील इतर महिला सहकाऱ्यांसाठी प्रेरणा ठरते” असे ‘ऑटो आय केअर’च्या कस्टमर सर्व्हिसची मुख्य शबनम खान म्हणाली.

२०१९साली सुरू झालेल्या या ॲपने देशातील ९९८ शहरांमध्ये ५०,०००हून अधिक सर्व्हिस सेंटरसोबत वाहतूक सेवेचे जाळे विस्तारले आहे. वाहनचालकांना देशभरात अगदी सहजपणे त्यांच्या जवळील गॅरेज, मेकॅनिक ट्रॅक करता यावे यासाठी या ॲपने इंटिग्रेटेड आर्टिफिशिअल इंटेलिजन्स मोबाईल इंटरफेस सेवा कार्यान्वित केली आहे. सुसज्ज कार्यशाळा, तज्ञ कर्मचारी, ऑथेंटिक स्पेअर्स अशा अनेक सुविधा पुरविणारे ‘ऑटो आय केअर’चे जाळे देशभरात विस्तारले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button