इतर

रेखा जरे हत्येतील मुख्य सूत्रधार बाळ बोठेने तीन महिने पोलिसांना कसा चकवा दिला?

अहमदनगर : सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे उर्फ बाळासाहेब जगन्नाथ बोठे याला अखेर नगर पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल तीन महिने पोलिसांना चकवा देणारा बोठे होता तरी कुठे? आणि पोलिसांना तो का सापडत नव्हता? असे अनेक प्रश्न उभे राहीले आहेत.

बाळ बोठे गेले तीन महिने हैद्राबादमधील बिलालनगर येथे लपून बसला होता. पोलिसांच्या हातावर तुरी देत तो महाराष्ट्रातून केव्हा पसार झाला हे कोणाला कळाले कसे नाही? ज्याच्या नावावर हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे असा आरोपी पोलिसांच्या नजरेतून सहज सुटतो आणि महाराष्ट्राची सीमा ओलांडून हैद्राबादमध्ये तीन महिने बिनधास्तपणे राहतो हे सगळंच एखाद्या चित्रपटाच्या कथानकासारखं आहे. बोठे उस्मानिया विद्यापीठात पीएचडी पदवी शिक्षण घेत असताना त्याची ओळख काहीजणांशी झाली होती. यात जनार्दन अकुला चंद्राप्पा या क्रिमिनल लॉयर (गुन्हेगारांचा वकील) चाही समावेश होता.. गुन्हेगारांना आश्रय देण्यासाठी तो कुप्रसिदध आहे. त्याच दोस्तीची मदत घेत बोठेने हैद्राबाद गाठलं. अत्यंत चलाखीने तो तिथे राहत होता. बी. बी. पाटील या नावाने प्रतिभानगरमध्ये एका हॉटेलच्या १०९ नंबर रुममध्ये त्याच्या राहण्याखाण्याची सोय करण्यात आली होती. पण विशेष म्हणजे ज्या रुममध्ये बोठे मुक्कामाला होता. त्याच्या दरवाज्याला बाहेरून कुलूप लावण्यात आले होते.

कोणीही ओळखू नये म्हणून बोठे कधी साडी नेसून तर कधी दाढी वाढवून बाहेर जायचा. अशाच प्रकारे तब्बल तीन महिने तो वेषांतर करत होता. यादरम्यान, पोलिसांचा तपास कुठपर्यंत आलाय हे जाणून घेण्यासाठी बोठे वेगवेगळ्या क्रमांकावरून महेश वसंतराव तनपुरे याला फोन करायचा. यामुळे बोठेचा अत्तापत्ता पोलिसांना लागत नवह्ता. महाराष्ट्रासह पंजाब, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, या राज्यांसह सुमारे शंभरपेक्षा अधिक ठिकाणी पोलिसांनी शोध मोहीम राबविली. अखेर तीन दिवसांपूर्वी तो हैद्राबादमध्ये असल्याचे पोलिसांना कळाले. पोलीस हैद्राबादमध्ये आल्याची भनक बोठेला लागली. त्यानंतर त्याने आपले ठिकाण बदलले, पण अखेर शनिवारी पहाटे नगर पोलिसांनी बोठेला बेड्या ठोकल्या.

हैदराबादच्या बिलालापूर भागातील हॉटेलमधून अटक

बोठेला मदत करणारा जनार्दन अकुला चंद्राप्पा, राजशेखर अजय चाकाली (वय 25 ,आंध्र प्रदेश), शेख इस्माईल शेख अली (वय 30,आंध्रप्रदेश), अब्दुल रहमान अब्दुल आरीफ (वय 52, आंध्रप्रदेश) यांना अटक करण्यात आली, तर पी अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी (हैद्राबाद) ही महिला फरार आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button