रुबीना दिलैक बिग बॉस 14 ची विजेती
मुंबई : गेल्या 20 आठवड्यांपासून सुरु असलेल्या बिग बॉसच्या 14 व्या मोसमाचा महाअंतिम सोहळा आज पार पडला. हा महाअंतिम सोहळा आणि हे मोसम कायमस्वरुपी स्मरणात राहील, असं ठरलं. या भव्य रिअॅलिटी शोची विजेती ही रुबीना दिलैक ठरली आहे. शेवटच्या क्षणी राहुल वैद्य आणि रुबीना यांच्यात काँटे की टक्कर बघायला मिळाली. मात्र, रुबीना हीला प्रेक्षकांनी जास्त पसंती दिली. त्यामुळे रुबीना या मोसमाची विजेती ठरली.
रुबीना आणि राहुल वैद हे या मोसमातील दोन फायनलिस्ट ठरले होते. निक्की तांबोळी ही तिसरी फायनलिस्ट घराबाहेर पडली. महाअंतिम सोहळ्याचा शेवटचा क्षण हा खूप भावस्पर्शी आणि भावनिक बघायला मिळाला. बिग बॉसने राहुल आणि रुबीना यांच्यात या मोसमात कशाप्रकारे स्पर्धा रंगली, त्यांच्यातील असलेल्या टोकाच्या मतभेदाची आठवण करुन दिली. अंतिम क्षणी घरातून बाहेर पडताना दोघी खूप भावूक झाले. राहुल वैद्य बिग बॉसच्या घरात नतमस्तक झाला. त्याने सलमान खानचे देखील आभार मानले.
या सीझनचा विजेता कोण असेल याची प्रेक्षकांना प्रचंड उत्सुकता लागली होती. गेल्या दोन आठवड्यांपासून प्रेक्षक या दिवसाची वाट पाहत होते. अखेर आज प्रेक्षकांना बिग बॉस सीझन 14 चा विजेता माहित पडला आहे.
यावर्षीच्या सीझनमध्ये 23 स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये काही नवखे स्पर्धक होते. तर काही गेल्या सीझनमधील होते. तर काही स्पर्धकांनी वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली. अंतिम सामन्यात बिग बॉसच्या घरात फक्त पाच स्पर्धक शिल्लक होते. यामध्ये रुबीना दिलैक, अली गोनी, राखी सावंत, राहुल वैद्य आणि निक्की तांबोली यांचा समावेश होता. या सर्वांची आज बिग बॉसच्या घरातून सुटका झाली. तर रुबीना दिलैक विजेती ठरली.