फोटो गॅलरी

राहुल गांधींनी मासे पकडले अन् समुद्रात डुबकीही घेतली

काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या केरळ दौऱ्यावर असून तेथील सर्वसामान्य नागरिकांशी एकरुप होण्याचा, त्यांच्यात मिसळण्याचा प्रयत्न करत आहेत. सध्या, सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत. केरळमधील जनतेला राहुल गांधींचं एक वेगळं रुप दिसून आलं, केरळच्या कोल्लममध्ये राहुल गांधी मासेमारांसह समुद्रात गेले अन त्यांच्यासोबत मासेमारी करताना दिसले. राहुल गांधी यांनी येथील मासेमारांशीही चर्चा केली, त्यांच्याबरोबर नावेत बसून समुद्रात मासेमारी करण्याचा आनंदही लुटला. राहुल गांधींचा साधेपणा पाहून येथील मच्छीमारांनाही आनंद झाला. कोल्लम येथे मच्छीमारांशी बोलतांना राहुल गांधी म्हणाले, ज्या पद्धतीने शेतकरी शेतात काम करतात त्याच पद्धतीने मासेमार समुद्रात काम करतात .केंद्र सरकारमध्ये शेतकर्‍यांसाठी स्वतंत्र मंत्रालय आहे, परंतु मासेमारांसाठी स्वतंत्र मंत्रालय नाही. राहुल गांधी केरळ मध्ये मच्छीमारांसोबत पाण्यात उतरले होते. तसेच त्यांच्यासोबत मासेमारी केली अन् सुमद्रात डुबली लावून पोहण्याचा आनंदही घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button