राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोरोनाची दुसर्यांदा लागण

मुंबई – राज्यमंत्री बच्चू कडू यांना देखील कोरोनाची लागण झाली असून त्यांची कोरोना चाचणी दुसर्यांदा पॉझिटिव्ह आली आहे. बच्चू कडू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली असून संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची काळजी घ्यावी असं देखील म्हटलं आहे.
“माझी कोरोना चाचणी दुसर्यांदा पॉझिटिव्ह आली असून, सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची काळजी घ्यावी, आवश्यक वाटत असेल, तर स्वतःची चाचणी करून घ्यावी” असं कडू यांनी म्हटलं आहे. अचलपूर मतदारसंघाचे आमदार तथा अकोल्याचे पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता त्यांची दुसरी कोरोना चाचणी देखील पॉझिटिव्ह आली आहे.
माझी कोरोना चाचणी दुसर्यांदा पॉजिटीव्ह आली असून, सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वत:ची काळजी घ्यावी, आवश्यक वाटत असेल, तर स्वतःची चाचणी करून घ्यावी.