मुलुंडमध्ये रेव्ह पार्टी, २५ तरुण-तरुणींना अटक; कोरोनाचे नियम धाब्यावर
Rave Party in Mulund, 25 youths arrested; Covid-19 rules violated

मुंबई : कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून मुंबईतील अनेक उपनगरात पार्टी, दारु पार्टी, हुक्का यांसारखे प्रकार सुरूच आहेत. या सर्व पार्ट्यांकरता एकत्र जमून अनेकजण आपल्याबरोबर इतरांचंही आयुष्य धोक्यात घालत आहेत. मुलुंमधील अशाच एका रेव्ह पार्टीतून मुंबई पोलिसांनी २५ तरुण-तरुणींना अटक केली आहे. हुक्का लाउंजमध्ये पार्टी करणं या तरुण-तरुणींना भारी पडलं आहे.
दिवसेंदिवस कोरोनाची (Coronavirus Pandemic) परिस्थिती भयावह बनत चालली आहे. महाराष्ट्रातून (Coronavirus Cases in Maharashtra)आणि खासकरून मुंबईतून (Mumbai COVID-19 Update) येणारी कोव्हिड-19 ची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. त्यातच अद्याप अनेकांना शहाणपण आल्याचे दिसत नाही आहे. मुलुंडमधील एका पबमध्ये काही तरुण-तरुणी लॉकडाऊन असून देखील (रात्री ८ नंतर) हुक्का आणि दारु पित होते. पोलिसांनी माहिती मिळताच ‘बूमरो’ नावाच्या एका पबवर छापा टाकला. छाप्यादरम्यान मुंबई पोलिसांच्या पथकाला असे आढळून आळे की, रात्री ८ वाजल्यानंतर कलम १४४ अन्वये नाइट कर्फ्यू असतानाही पबमध्ये मुलं-मुलींना दारू, सिगरेट आणि हुक्का दिलं जात होतं. कोरोना व्हायरसचे संक्रमण सध्या वाढते आहे, याच पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. या परिसरात या तरुणांची हुक्का लाउंजमध्ये दारु, सिगरेट आणि हुक्का पार्टी सुरू होती. त्याचवेळी पोलिसांनी छापा टाकून २५ जणांना अटक केली आहे.
Rave Party in Mulund, 25 youths arrested; Corona’s rules violated
Mumbai: In many suburbs of Mumbai, liquor parties and hookah parties are still going on following the rules of corona. Together for all these parties, many are risking the lives of others along with us. Mumbai police have arrested 25 youths from a similar rave party in Mulund.
Having a party in the hookah lounge is overwhelming for these youngsters.The condition of Coronavirus Pandemic is getting worse day by day. Covid-19 cases from Maharashtra and especially from Mumbai are alarming. Many still do not seem to have the wisdom. In a pub in Mulund, some youngsters were smoking hookah and drinking alcohol (after 8 pm) despite the lockdown. Upon receiving the information, the police raided a pub called ‘Boomro’. During the raid, the Mumbai Police team found that after 8 pm, despite a night curfew under Section 144, boys and girls were being given alcohol, cigarettes and hookah in the pub.
Coronavirus infections are on the rise, and this is the reason why this action has been taken. In the area, the youths were having a liquor, cigarette and hookah party in the hookah lounge. At the same time, police raided and arrested 25 people.