Uncategorized

मुंबईत बड्या राजकारणी, अधिकाऱ्यांना पूजा शर्माचा व्हिडीओ कॉल; पॉर्न मॉर्फकरून लाखोंना लुटले

मुंबई : जसे डिजिटलाझेशन वाढत आहे, तस तसे सायबर गुन्हेगार देखील बोकाळले आहेत. अलीकडच्या काळात सायबर गुन्हेगारी वाढत आहे. पण, गेल्या काही महिन्यांपासून एक वेगळ्या प्रकारचा सायबर गुन्हा चर्चेत आला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या सायबर गुन्ह्याचा प्रकार आहे सेक्सटोर्शन. मुंबईपोलिसांच्या सायबर सेलने आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या या सेक्सटोर्शन रॅकेटचा पर्दाफाश केला असून तिघांना अटक केली आहे. या प्रकरणात एका बड्या राजकीय नेत्याला आरोपींनी लक्ष्य केल्यानंतर सायबर पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

सायबर सेलच्या पोलिसांनी या प्रकरणात राजस्थान, हरियाणा आणि उत्तरप्रदेशमधून तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. तिघेही आरोपी आठवी आणि दहावीचे शिक्षण घेतलेले असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. विशेष म्हणजे हे आरोपी समाजातील प्रतिष्ठीत, उच्चभ्रू लोकांना टार्गेट करतात. यामध्ये अधिकारी, राजकारणी, आयएएस, आयपीएस, आमदार, खासदार आणि अनेक महत्वाच्या लोकांचा समावेश आहे.

सुरुवातीला सोशल मीडियावर एका सुंदर मुलीचा फोटो ठेवून एक बनावट अकाऊंट उघडण्यात येतं. त्याद्वारे या प्रतिष्ठीत लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. नंतर संबंध वाढवले जातात. या प्रकरणात पूजा शर्मा या फेसबुकवरील अकाऊंटच्या नावाने लोकांना बळी पाडलं जात होतं. त्यामुळे पूजा शर्मा या नावाची तब्बल १५१ फेसबुक अकाऊंट आणि काही टेलिग्राम चॅनेल्सही बॅन करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

काही दिवस लोटल्यानंतर सोशल मीडियावर जवळीक वाढल्यानंतर संबंधित व्यक्तीला अचानक एक दिवस व्हिडिओ कॉल केला जातो आणि अश्लील व्हिडीओ क्लिप्स दाखवल्या जातात. असावधपणे समोरच्या व्यक्तिने तो व्हिडिओ पाहिल्यास त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्याद्वारे त्याला ब्लॅकमेल करून खंडणीची मागणी केली जाते. खंडणी न दिल्यास तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकण्याची धमकी दिली जाते. आपली बदनामी टाळण्यासाठी पीडित व्यक्ती आरोपींना पैसे देऊ करतात. अशाप्रकारे अनेक लोकांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे. मात्र, अनेकजण बदनामी होईल म्हणून तक्रार करण्यास पुढे येत नाहीत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button