साहित्य-कला

मला कुठलिही आर्थिक अडचण नाही, संतोष आनंद यांचे स्पष्टीकरण

मुंबई – एक प्यार का नगमा है…, जिंदगी की ना टूटे लडी… असे सदाबहार गाणी लिहिणारे सुप्रसिद्ध गीतकार संतोष आनंद नुकतेच ‘इंडियन आयडल’मध्ये दिसले. यावेळी संतोष आनंद यांना पाहून केवळ ‘इंडियन आयडल’च्या सेटवरचेच नाही तर त्यांना टीव्हीवर पाहणारे प्रेक्षकही भावूक झालेत. ‘इंडियन आयडल’ची जज नेहा कक्कर तर ढसाढसा रडली. यादरम्यान तिने संतोष आनंद यांना 5 लाख रूपयांची मदत केली. त्यानंतर, सोशल मीडियावर काही चुकीच्या बातम्या पसरल्या गेल्या, त्यासंदर्भात स्वत: संतोष आनंद यांनी स्पष्टीकरण दिलंय.

इंडियन आयडॉलचे मी मनापासून आभार मानतो, खूप दिवसानंतर मी मुंबईला गेलो, तेथे मला मोठा सन्मान मिळाला. कित्येक वर्षानंतर लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचीही भेट झाली. या कार्यक्रमातील उपस्थितीमुळे मला आनंद मिळाला, असे संतोष आनंद यांनी एका स्थानिक मीडियाशी बोलताना सांगितले. तसेच, आपल्या आर्थिक परिस्थितीबाबतही त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावरही त्यांनी उत्तर दिलं. नेहा कक्कर मला पाहून भावूक झाल्या होत्या, त्यामुळे त्यांनी मला 5 लाख रुपये देण्याची इच्छा व्यक्त केली. मी स्वाभीमानी असल्यामुळे घेणार नसल्याचं म्हटलं. मात्र, त्यांनी मला नातीकडून भेट म्हणून स्विकारण्याची विनंती केली. त्यानंतर, मी ती रक्कम स्विकारली. माझी आर्थिक परिस्थिती हालाकीची नाही, किंवा मला आर्थिक गरजही नाही, असे स्पष्टीकरण गीतकार संतोष आनंद यांनी दिले. माध्यमांत काही जणांनी जाणीवपूर्वक अशा बातम्या दिल्या असतील, काहींना बातम्या विकायच्या असतील, पण ते अजिबात सत्य नाही, असेही ते म्हणाले

दरम्यान, नेहाची ही ‘ऑन कॅमेरा’ मदत अनेकांना रूचली नाही. लोकांनी यावरून नेहालाच नाही तर ‘इंडियन आयडल’च्या मेकर्सलाही जबरदस्त ट्रोल केले. टीआरपीसाठी तुम्ही आणखी किती खालची पातळी गाठणार? असा संतप्त सवाल युजर्सनी केला. ‘इंडियन आयडल 12’च्या सेटवर आलेल्या संतोष आनंद यांनी त्यांची सध्याची परिस्थिती आणि मुलगा व सुनेबद्दल सांगितले. त्यांनी सांगितेली कर्मकहाणी ऐकून प्रत्येकाचे डोळे पाणावले. यादरम्यान नेहा कक्करने संतोष आनंद यांना 5 लाख रूपयांची मदत देऊ केली. तुमची नात समजून हे पैसे घ्या, असे नेहा संतोष आनंद यांना म्हणाली. पण नेटकर्‍यांना कदाचित हे रूचले नाही. टीआरपीसाठी मेकर्सनी गरिबीची थट्टा केल्याचा आरोप अनेक नेटक-यांनी केला. अन्य एका युजरनेही नेहाला ट्रोल केले. मदत ऑफ कॅमेरा करायला हवी होती. सेटवर बोलावून नाही. जगासमोर मदत करण्यासाठी नेहा व्यक्तिश: भेटून त्यांना मदत देऊ शकली असती, असे या युजरने लिहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button