भारतीय निर्देशांक विक्रमी स्तरावर
मुंबई : बेंचमार्क निर्देशांकांनी आजच्या व्यापारी सत्रात विक्रमी उच्चांक गाठला. या नफ्याचे नेतृत्व बँकिंग व वित्तीय क्षेत्रांनी केले. निफ्टीने १.००% किंवा १५१.४०% अंकांची वृद्धी घेतली. निफ्टीने १५,००० ची पातळी पार करत १५,३१४.७० ची स्थिती गाठली. एसअँडपी बीएसई सेन्सेक्सने १.१८% किंवा ६०९.८३ अंकांनी वाढ अनुभवली व तो ५२,१५४.१३ अंकांवर स्थिरावला. आज जवळपास १,३३७ शेअर्सनी नफा कमावला तर १,६४८ शेअर्स घसरले तर १४९ शेअर्स स्थिर राहिले.
एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की, आजच्या व्यापारी सत्रात अॅक्सिस बँक (६.२१%), आयसीआयसीआय बँक (४.१६%), एसबीआय (४.०३%), बजाज फायनान्स (३.५८%), व इंडसइंडबँक (३.०८%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर याउलट एसबीआय लाईफ (२.२७%), एचडीएफसी लाईफ (२.०५%), डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज (१.८०%), टाटा स्टील (१.४७%), व टीसीएस (१.३१%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले.
क्षेत्रीय आघाडीवर, बँक निफ्टीने ३.३% ची वाढ घेतली, पीएसयू बँकेने २.३% आणि बीएसई रिअॅलिटीने १.४% ची वाढ घेतली. तर बीएसई मिडकॅप व बीएसई स्मॉलकॅपने अनुक्रमे १.४०% व ०.३७% ची वाढ अनुभवली.
व्होडाफोन आयडिया: व्होडाफोन आयडिया कंपनीने डिसेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत नफा नोंदवला. परिणामी कंपनीचे स्टॉक्स ३.२०% नी घसरले व त्यांनी १२.१० रुपयांवर व्यापार केला. कंपनीला एकूण निव्वळ नफा कमी झाला, तरीही बाजारात तोटा सहन करावा लागला.
अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइज लि.: अपोलो हॉस्पिटल्सने डिसेंबरच्या तिमाहित अपेक्षेपेक्षा अधिक चांगली कामगिरी झाल्याचे नोंदवले. त्यामुळे कंपनीचे स्टॉक्स १३.१० % नी वाढले व त्यांनी ३,१०८.०० रुपयांवर व्यापार केला. फर्मचा एकूण निव्वळ नफा ४९.१४% नी वाढला व कमी खर्चामुळे तिसऱ्या तिमाहीत तो १३४.१६ कोटी रुपये एवढा झाला.
दीपक नायट्राइट लि.: कंपनीने ऑपरेशनल कामगिरीत मजबूत वाढ दर्शवली. त्यानंतर कंपनीचे स्टॉक्स ६.५१% नी वाढले व त्यांनी १,१८३.०० रुपयांवर व्यापार केला. फर्मच्या ईबीआयटीडीए समोर एकूण उत्पन्न २५% नी वाढले तर महसुलातही ९% ची वृद्धी झाली.
टीव्हीएस मोटर कंपनी लि.: टीव्हीएस मोटर कंपनीने पब्लिक मोटर्ससोबत नवी पार्टनरशिप घोषित केली. परिणामी कंपनीचे स्टॉक्स ०.६९% नी घसरले व त्यांनी ६३२.०५ रुपयांवर व्यापार केला.
भारतीय रुपया: देशांतर्गत इक्विटी बाजारात खरेदी दिसून आल्याने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाने १६ पैशांची वृद्धी घेत ७२.५८ रुपयांचे मूल्य कमावले.