राजकारण
Trending

बांग्लादेशी अल्पसंख्यांकांना पद देण्याची भाजपवर नामुष्की : महेश तपासे 

मुंबई : बांग्लादेशातून मुंबईमध्ये बेकायदेशीररीत्या घुसखोरी करून राहणाऱ्या रुबेल शेख याला भाजपने उत्तर मुंबई अल्पसंख्याक विभाग युवक जिल्हाअध्यक्ष केल्याची माहिती पोलिस छाप्यात समोर आली असून भाजपवर बांग्लादेशी तरुणाला पद देण्याची नामुष्की आली आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.
दरम्यान भाजपच्या बांग्लादेशी कनेक्शनची चौकशी करण्यात यावी अशी मागणी महेश भारत तपासे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. एकीकडे भाजपाच्या विरोधात बोलणाऱ्यांना देशद्रोहीचा ठपका ठेवणारे भाजपाचे कार्यकर्ते आता बांग्लादेशी असल्याचे समोर येत आहेत.
बांग्लादेशातून मुंबईमध्ये बेकायदेशीररीत्या घुसखोरी करून राहणाऱ्या रुबेल जोनू शेख याने खोटी कागदपत्रे तयार केल्याची माहिती पोलिसांनी टाकलेल्या धाडीत समोर आली आहे. याच तरुणाला भाजपने उत्तर मुंबई अल्पसंख्याक विभाग युवक जिल्हाध्यक्ष हे पद दिल्याचे समोर आले आहे.  या युवकाने तयार केलेली त्याची सर्व कागदपत्रे ही बोगस असल्याचेसुध्दा समोर आली असून देशद्रोहाची भाषा करणारे भाजपाचे नेते मात्र या प्रकरणात गप्प का आहेत असा सवालही तपासे यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button