लाईफस्टाईल
फेसपॅकने उजळेल तुमचा चेहरा

अनेकांच्या स्वयंपाकघरामध्ये गरम मसाल्याचा सर्रास वापर केला जातो. या मसाल्यांचा उपयोग करुन आपण अनेक पदार्थ चविष्ट बनवतो. मात्र, त्यातील असे अनेक पदार्थ आहेत. ज्याचा चेहऱ्याकरता देखील वापर करण्यास मदत होते. त्वचा सुंदर आणि डागविरहित होण्यासाठी जायफळ हा सर्वात प्रभावी उपाय आहे. जायफळमध्ये त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते.
जायफळ आणि दूध
साहित्य
१ चमचा जायफळ पावडर
१ चमचा कच्चे दूध
कृती : सर्वप्रथम जायफळ पावडर आणि दूध एकत्र करुन त्याची चांगली पेस्ट करुन घ्यावी. ही पेस्ट चेहऱ्यासह मानेवर ३० मिनिटांसाठी लावून ठेवा. त्यानंतर थंड पाण्यानं चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. जायफळ आणि दुधातील पोषकतत्त्वांमुळे चेहऱ्यांवरील बंद झालेले छिंद्रे उघडण्यास मदत होते. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोन वेळा नक्की करू शकता.