प्रीमियर ग्लोबल पबजी पीसी ईस्पोर्टस् महोत्सवाला सुरूवात
सेऊल : क्राफ्टन आयएनसी या प्लेअर अननोन बॅटलग्राऊंड्स (पबजी) अशा विविध मनोरंजन मालमत्ता असलेल्या कंपनीने पबजी ग्लोबल इन्विटेशनल.एस (पीजीआय.एस) या जागतिक लॅन/ ऑनलाइन हायब्रिड टूर्नामेंटचे आयोजन केले आहे, ज्यात जगातील सर्वोत्तम पबजी पीसी ईस्पोर्टसच्या टीम्स ३.५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स प्राइज पॉटसाठी स्पर्धा करतील.
हा कार्यक्रम ८ फेब्रुवारी ते २८ मार्चदरम्यान चालणार आहे, ज्यात साप्ताहिक शोडाऊनमध्ये आठ विविध प्रदेशांतील ३२ रोस्टर्स सहभागी होतील आणि स्पर्धा वाढीस लागेल तशी बक्षिसाची रक्कमही वाढेल. ही स्पर्धा मुख्यत्वे ऑफलाइन स्वरूपात इंचिऑन, दक्षिण कोरियामध्ये स्टुडिओ पॅरेडाइसमध्ये आयोजित केली जाणार आहे. परंतु सध्याच्या कोविड-१९च्या परिस्थितीमुळे काही टीम्स आपल्या प्रदेशातून ऑनलाइन सहभागी होतील.
मागील ५-७ फेब्रुवारीदरम्यान आयोजित केलेल्या रँक डिसीजन मॅचेसवर आधारित राहून सर्वोच्च रँक मिळालेल्या १६ टीम्सनी ८ फेब्रुवारी रोजी आयोजित वीकली सर्व्हायवल मॅचेसमध्ये भाग घेतला आणि वीकली ग्रँड फायनल्समध्ये प्रवेश मिळवला. एखाद्या टीमने वीकली सर्व्हायवल मॅच जिंकल्यावर ते तात्काळ वीकली ग्रँड फायनल्समध्ये पाठवले जातात. त्यानंतर त्यांची जागा रँक डिसीजन मॅचेसमधील पुढच्या सर्वोच्च रँक मिळालेल्या टीमकडून घेतली जाते. वीकली फायनल्समध्ये सर्वोच्च रँक मिळालेल्या चार टीम्सना प्राइज पॉटचा एक भाग मिळतो. ही प्रक्रिया आठ आठवडे सलग सुरू राहते आणि एका अतिरिक्त पब्जी ईस्पोर्टस् स्पर्धेसाठी आठवड्याची सुट्टी घेतली जाते.
प्रत्येक साप्ताहिक उपक्रमात देण्यात येणाऱ्या पारितोषिकाच्या रकमेचा वाटा स्पर्धा पुढे जाते तसा वाढत जातो आणि कार्यक्रमाच्या शेवटी सर्वाधिक पारितोषिक मिळालेल्या टीमला चॅम्पियन्स घोषित केले जाते. पीजीआय.एस स्वरूप आणि नियम यांची संपूर्ण माहिती येथे पाहता येईल be found here.
पीजीआय.एसचे वेळापत्रक:
आठवडा १ वीकली सर्व्हायवल सामने: सोमवार ८ फेब्रुवारी, मंगळवार ९ फेब्रुवारी आणि बुधवार १० फेब्रुवारी दुपारी ३.३० वाजता.
सुरूवातीच्या आठवड्यानंतर वीकली सर्व्हायवल सामने मंगळवार, बुधवार आणि गुरूवारी दुपारी ३.३० वाजता.
वीकली फायनल्स सामने: हे सामने दर शनिवार आणि रविवारी संपूर्ण कार्यक्रमात दुपारी ३.३० पासून आयोजित केले जातील.
सर्व्हायवल टूर्नामेंट: ५- ७ मार्च, पीजीआय.एसमध्ये एक विशेष सामना.
या सर्व मॅचेस जागतिक पातळीवर १७ भाषांमध्ये विविध प्लॅटफॉर्म्सवर दाखवल्या जातील. आमच्या भारतातील पबजीच्या चाहत्यांसाठी क्राफ्टनने नोडविन गेमिंगसोबत भागीदारी केली आहे आणि ते स्थानिक स्ट्रीमर्सच्या माध्यमातून हिंदी ब्रॉडकास्ट दाखवतील- गेमिंगप्रो ओशियन, नोडविन गेमिंग, पेन फाइक्स, स्पार्की गेमिंग आणि अंश टीवाय. विविध भाषांमधील ब्रॉडकास्ट लिंक खाली पाहता येतील:
इंग्रजी – https://www.twitch.tv/pubg
इंग्रजी – https://www.youtube.com/pubgesports
गेमिंगप्रो ओशियन – https://www.youtube.com/channel/UCZmfb_gIPxsJ_aGmcWNOzlA
नोडविन गेमिंग – https://www.youtube.com/user/LordNODCasting
पेन फाइक्स – https://www.youtube.com/channel/UC8l-0ywUNKt3XBfobuzXGwA
स्पार्की गेमिंग – https://www.youtube.com/channel/UCgww-Z5nK8uqX2lM5lzgKDw
अंश वायटी – https://www.youtube.com/channel/UClHbJ2iUOVlgyG8-Y-CNzpA
क्राफ्टन आयएनसी पुन्हा एकदा ‘पिक’एम चॅलेंज सुरू करणार आहे- हा एक असा उपक्रम आहे, ज्यात चाहते पारितोषिक मिळवण्यासाठी पीजीआय.एसच्या विजेत्याचा अंदाज लावतील. चाहत्यांना मोफत मतदान कूपन्स मिळतील आणि ते इन गेम ईस्पोर्टस् टॅबला भेट देऊन पीजीआय.एस वस्तू खरेदी करू शकतील. पब्जी ईस्पोर्टसच्या खेळाडूंना पुरस्कार देण्याच्या क्राफ्टन आयएनसीच्या वचनबद्धतेनुसार ३.५ दशलक्ष डॉलरचा प्राइज पॉट ‘पिक’एम चॅलेंजमधून मिळालेल्या सर्व महसुलाच्या ३० टक्के असेल.
पबजी ईस्पोर्टच्या अद्ययावत माहितीसाठी कृपया भेट द्या- https://www.pubgesports.com/en.