Uncategorized

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणाचे गूढ आणखी वाढले

'पूजा अरुण राठोड'च्या गर्भपाताच्या रिपोर्टमुळे संशय बळावला

यवतमाळ :  पुणे येथील पूजा चव्हाण संशयित मृत्यूप्रकरणात यवतमाळातील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे नाव चर्चेत आले आहे. त्या अनुषंगाने पुणे पोलिसांचे पथक यवतमाळ मेडिकलमध्ये येऊन गेले. ६ फेब्रुवारीला पहाटे ४ वाजून ३४ मिनिटांनी मेडिलकच्या प्रसूती वार्ड क्र. ३ मध्ये दाखल झालेली ती युवती नेमकी कोण याचा उलगडा झालेला नाही. दाखल झालेल्या त्या युवतीचा पत्ताही नांदेड जिल्ह्यातील नोंदविण्यात आला आहे. यावरून संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोग विभागात ६ फेब्रुवारीला पहाटे ४.३४ वाजता दाखल झालेल्या त्या २२ वर्षीय तरुणीचा गर्भपात करण्यात आला. तिच्या शनिवारी दुपारी २ वाजेपर्यंत उपचार करण्यात आले. नंतर तिला सुटी देण्यात आली. उपचारासाठी दाखल तरुणी नेमकी कुठली हे स्पष्ट झाले नाही. ज्या युनिट २ मध्ये ती दाखल झाली, त्या युनिटच्या डॉक्टरांनाही याबाबत काहीच माहिती नाही. पहाटे तिला दाखल करून उपचार करणे डॉक्टर कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गर्भपात अर्धवट अवस्थेत झाल्यानंतर दाखल तरुणीला काही तासातच रुग्णालयातून सुटी कशी देण्यात आली, हेही एक कोड आहे.

विशेष म्हणजे या सर्व घडामोडी पुणे येथील पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणानंतर उजेडात आल्या आहेत. त्यामुळे या सर्व घटनाक्रमाबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. पूजा चव्हाण हिलाच नाव बदलवून यवतमाळ मेडिकलमध्ये दाखल केल्याचेही बोलले जात आहे. त्याच अनुषंगाने पुणे पोलिसांचे पथक सोमवारी यवतमाळात येऊन गेले.

‘पूजा अरूण राठोड’ कोण?

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आणखी मोठी माहिती समोर येते आहे. यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पूजा अरूण राठोड नावाच्या मुलीचा गर्भपात झाल्याची नोंद आहे. ही पूजा अरूण राठोड हीच पूजा चव्हाण आहे का याबाबत कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. पूजा अरूण राठोड नावाची महिला ६ फेब्रुवारीला पहाटे ४ वाजून ३४ मिनिटांनी या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल झालेली होती. तशी नोंद अहवालात आहे. तिचा वॉर्ड क्रमांक ३ होता आणि डॉ. श्रीकांत वराडे  यांनी तिच्यावर उपचार केल्याचं रिपोर्टमध्ये दिसतं आहे.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button