Top Newsराजकारण

पंतप्रधान मोदी देशद्रोही! राहुल गांधी यांनी दिले स्पष्टीकरण

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात पेगॅससचा प्रयोग केला गेला. राफेल लढाऊ विमान खरेदीची चौकशी थांबवण्यासाठी पेगाससचा प्रयोग केला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे शस्त्र आमच्या देशाविरोधात वापरले असून त्यासाठी फक्त एकच शब्द आहे ‘देशद्रोह’, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पेगासस पाळतप्रकरणी म्हटले. मोदी सरकारवर हल्ला करताना गांधी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची आणि मोदी यांची न्यायालयीन चौकशीची मागणी केली. राहुल गांधी यांनी इस्रायलने पेगाससला क्लासिफाइड शस्त्राच्या यादीत ठेवले आहे. ते अतिरेकी आणि गुन्हेगारांसाठी वापरले जाते; परंतु मोदी आणि शहा देशाविरोधातच ते वापरत आहेत, असा आरोप राहुल गांधींनी केला.

काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी पेगॅसस पाळतप्रकरणी विचारले की, पेगॅसस सॉफ्टवेअर सरकार किंवा सरकारच्या कोणत्या एजन्सीने विकत घेतले आहे का? जर सरकारने विकत घेतले असेल तर जे सॉफ्टवेअर दहशतवादी कारवायांत गुंतलेल्या लोकांवर वापरले जायला हवे ते आपलेच अधिकारी, आपलेच राजकीय नेते, आपल्याच पक्षाचे नेते, पत्रकार, कार्यकर्ते, सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित लोकांवर वापरले गेले? जर सरकारने वापरले नाही तर मग सरकारने हेरगिरी केली.

काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी, शशी थरूर, पी. चिदम्बरम, के. सी. वेणुगोपाल यांच्यासह पक्षाच्या बहुतांश खासदारांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापाशी हेरगिरीच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button