Uncategorized

नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधींना उच्च न्यायालयाची नोटीस

नवी दिल्ली – नॅशनल हेराल्ड प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने खालच्या न्यायालयाच्या सुनावणीला स्थगिती दिली आहे. याच बरोबर न्यायालयाने सोमवारी आरोपी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी तथा इतर काही मंडळींना नोटीस बजावत, भाजप खासदार सुब्रमण्यन स्वामी यांच्या याचिकेसंदर्भात उत्तरही मागितले आहे. खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणी खालच्या न्यायालनाने दिलेल्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

खालच्या न्यायालयाने स्वामी यांनी दाखल केलेल्या याचिकेतील मुख्य साक्षींच्या आधारे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी तसेच इतरांवर खटला चालविण्याची परवानगी देण्यास नकार दिला होता. आता न्यायमूर्ती सुरेश कैत यांनी सोनिया गांदी, राहुल गांधी, एआयसीसी महासचिव ऑस्कर फर्नांडिस, सुमन दुबे, सॅम पित्रोदा आणि ‘यंग इंडिया’ (वायआय) यांच्या कडून 12 एप्रिलपर्यंत स्वामींच्या याचिकेवर उत्तर मागवले आहे.

फसवणूक आणि अयोग्य मार्गाने पैसा मिळविण्याचे षड्यंत्र केल्याचा आरोप –
भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या वतीने वकील सत्या सभरवाल आणि गांधी कुटुंब तथा इतरांकडून वकील तरन्नुम चीमा यांनी, उच्च न्यायालयाने नोटीस जारी केल्यासंदर्भात आणि 12 एप्रिलपर्यंत सुनावणी स्थगित केल्यासंदर्भात पुष्टी केली आहे. स्वामी यांनी खालच्या न्यायालयात दाखल केलेल्या आपल्या तक्रारीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याशिवाय इतरही काही लोकांवर फसवणूक आणि अयोग्य मार्गाने पैसा मिळविण्याचे षड्यंत्र केल्याचा आरोप केला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button