Top Newsराजकारण

दोस्त दोस्त ना रहा ! नरेंद्र भाई मेरे अच्छे दोस्त थे, पर अभी बिगड गये !

बेरोजगारी वाढविणारे भारताचे आर्थिक धोरण; मोदींच्या जिवलग मित्राचा तुफान हल्लाबोल

वर्धा : देशात झपाट्याने होत चाललेलं खासगीकरण माझ्या समजण्यापलीकडचं असल्याचं सांगत ‘नरेंद्र भाई मेरे अच्छे दोस्त थे, पर अभी बिगड गये’, असं एकेकाळचे जीवलग मित्र प्रवीण तोगडिया म्हणाले. देशाची आर्थिक परिस्थिती, ढासळलेली अर्थव्यवस्था आणि झपाट्याने होत चाललेलं खासगीकरण या मुद्द्यांवरुन तोगडिया यांनी मोदींवर जोरदार टीका केली. मोदी सरकारचं आर्थिक बेरोजगारी वाढविणारे असल्याची टिप्पणी करत मोदींजींची आर्थिक धोरणं काही कामाची नसल्याची टीका त्यांनी केली.

वर्ध्यात आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद, राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीनं कार्यकर्ता संमेलन आयोजित करण्यात आलं. यावेळी कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत तोगडिया बोलत होते. यावेळी तोगडिया यांनी नरेंद्र मोदी भेटत नसल्याची खंत व्यक्त करताना आर्थिक मॉडेलवर टीका केली. भारताचा किंवा जगातला कोणताही व्यापारी फायद्यासाठी काम करतो यात दुमत नाही. पण हा नफा कोणाकडून कमावतो हा प्रश्न आहे. जेवढ्या सरकारी संस्था या खासगीकरणात जाणार तेवढे पाच टक्के जास्त पैसे जनतेला चुकवावे लागणार आहेत. रोड, रेल्वेस्टेशन, स्टेडियम हे खासगी लोकांना देणं हे माझ्या समजण्यापलीकडे आहे. या संस्था खासगी संस्थांना देणे म्हणजे देशाच्या जनतेला लुटणे असंच आहे, असं ते म्हणाले.

युरोपात सरकारी मालमत्तेचं खासगीकरण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र तेथील परिस्थिती बिकट झाली आणि सरकारला सबसिडी दयावी लागली. भारताचं इकॉनॉमिकल मॉडेल बदलावे लागेल. एक टक्का जीडीपी वाढल्यास एक कोटी रोजगार वाढला पाहिजे मात्र भारतात तसं होत नाही याला ‘जॉबलेस ग्रोथ’ म्हणतात. जीडीपी वाढल्यास सरकारच उत्पन्न वाढतं, सध्या भारताचे इकॉनॉमिकल मॉडेल हे जॉबलेस ग्रोथचे आहे, यात सरकारला कर मिळेल मात्र तुम्हाला रोजगार मिळणार नाही, असंही तोगडिया म्हणाले.

नरेंद्र मोदी माझे मोठे भाऊ आहेत. आमचे संबंध काही देखाव्याचे नाहीत. नरेंद्र मोदी आता सोबत बसत नाहीत. माझ्यासोबत बसले तर त्यांना काही गोष्टी समजावून सांगू, असा चिमटाही तोगडिया यांनी काढला.

नरेंद्र मोदी हे माझे मोठे भाऊ आहे. माझ्या गावातून भाजी येत होती आणि ती माझ्या घरी येऊन नरेंद्र मोदी खात होते. आमचे संबंध काही देखाव्याचे नाहीत. पण त्यांचं वागणं बदललंय असं सांगत ‘दोस्त दोस्त ना रहा’, अशा प्रकारची सध्या अवस्था झाल्याचं त्यांनी आपल्या भाषणातून सांगितलं.

त्यांना राममंदिरच्या सुरुवातीला बाबरी मस्जिदीसाठी लढणारा अन्सारी प्रिय झाला. ज्याने राम मंदिरसाठी जीवन भर लढा दिला, तो प्रवीण तोगडिया प्रिय झाला नाही. मेरे नरेंद्र भाई को बाबूओ ने बिगाड दिया, नरेंद्र भाई बहोत अच्छे है, असं तोडगिया म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button