मुंबई : देशातील श्रीमंत आणि बड्या राजकीय नेत्यांकडून धमकावण्यात येत आहे. कोरोना लसींचे आश्वासन पाळण्यात अडथळा येत असल्यामुळे लंडनमध्ये कोरोना लसीचे उत्पादन करण्याचे ठरवले आहे. सारखे येणारे फोन कॉल हे अत्यंत त्रासदायक आहेत, असा गौप्यस्फोट सीरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक अदर पुनावाला यांनी केला आहे. मला धमक्या दिल्या जात आहेत. सत्य बोललो तर माझे शीर कापले जाईल अशी भीती व्यक्त करून अदर पुनावाला लंडनला निघूल गेले आहेत. परदेशातही कोरोना लसीचे उत्पादन घेण्याचे अदर पुनावाला यांनी ठरवले आहे.
सीरम इन्स्टिट्यूटचे मालक अदर पुनावाला यांनी ‘द टाईम्स’ला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये अदर पुनावाला यांनी फोन कॉल करून धमक्या येत असल्याचे म्हटले आहे. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी आणि देशातील नागरिकांना लसीकरण करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटमध्ये लस उत्पादित केली जात आहे. परंतु सीरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक अदर पुनावाला यांना देशातील व्यक्तींकडून धमक्या दिल्या जात आहेत.
अदर पुनावाला यांनी सांगितले की, देशातील शक्तिशाली नेते, व्यक्तिंचे फोन येतात. राज्यातील मुख्यमंत्र्यांचे, व्यावसायिक प्रमुखांचे कोविशिल्ड लसीच्या तत्काळ पुरवठ्याची मागणी करण्यासाठी फोन येत असतात. लस मिळवण्याची इच्छा आणि आक्रमकता यातील अंतर अभूतपूर्व असल्याचे पुनावाला यांनी म्हटले आहे. काही फोन कॉल धमक्यांचे आले आहेत. यामध्ये जर खर बोललो तर शीर कापले जाईल अशी भीती आहे.
खरे की खोटे देशाला कळायला हवं : आव्हाड
यावर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशातील नागरिकांचे रक्षण आणि जीव वाचवणाऱ्या अदर पुनावाला यांना कोण धमकी देत आहे. अदर पुनावाला यांना धमकी कोणी दिली आणि हे काय प्रकरण आहे. यामध्ये खरे काय आणि खोटे काय हे देशातील नागरिकांना कळायला हवे असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. आव्हाडांनी तत्काळ ट्विट करत यासंदर्भात खरे काय खोटे काय याबाबत माहिती झाले पाहजे असे म्हटले आहे. जितेंद्र अव्हाड यांनी म्हटले आहे की, सिरम इस्टिट्यूटचे अदर पुनावाला लंडनला निघून गेलेत अशी बातमी आहे . द टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं आहे की मला धमक्या मिळत आहेत,आणि सत्य बोललो तर शीर कापले जाईल.देशाला हे कळायला हव #खरे_की_खोटे असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
एक व्हिडिओही आव्हाडांनी प्रसारित केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, सीरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक आदर पुनावाला यांनी मुलाखत दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, मला धमक्या मिळाल्या आहेत. जर खरे बोलले तर माझा गळा कापण्यात येईल, हे काय सत्य आहे आणि कोण त्यांना धमक्या देत आहेत. जो माणूस भारतातील ५० कोटी लोकांना वाचवू शकतो अशा माणसाला कोण धमकी देऊ शकते. पुनावाला लंडनला का जात आहेत. यामागचे सत्य देशातील सर्वांना समजले पाहिजे. कारण आताच्या घडीला विचारले तर देशातील सर्वात महत्त्वाचा माणूस कोण? तर तो आहे अदर पुनावाला असे आव्हाड म्हणाले आहेत. कारण जीव वाचवणाऱ्यापेक्षा मोठा कोणी नसतो. जीव घेणारे या भारतात भरपूर आहेत. स्मशान भूमी आणि कब्रस्तानमध्ये लागलेल्या रांगांवरुन समजते आहे जीव कसे जात आहेत आणि कोण जीव घेणारे आहे. परंतु जीव वाचवाणारा एकच आहे आणि तो अदर पुनावाला आहे. जर अदर पुनावाला भारतातून गेले तर देशाची मोठी नामुष्की आहे.