स्पोर्ट्स

डे-नाईट कसोटीसाठी टीम इंडिया सज्ज

अहमदाबाद : भारत आणि इंग्लंड संघादरम्यान सध्या कसोटीचे सामने सुरू आहेत. 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना हा 24 फेब्रुवारी रोजी अहमदाबादच्या मोटेरा स्टेडिअमवर खेळला जाईल. भारतीय संघाचा हा तिसरा डे-नाईट कसोटी सामना असून यासाठी कर्णधार विराट कोहली आणि संघाने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचबरोबर भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवला फिटनेससाठी 1-2 दिवस द्यावे लागणार आहे.

कर्णधार कोहलीने मैदानात जोरदार सराव केला. त्याने वेट ट्रेनिंग करताना सोशल मीडियावर ‘सात्यत हीच यशाची गुरुकिल्ली’ असे लिहीत एक फोटो शेअर केला. भारत आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यामध्ये दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत आहेत. सिरीजच्या शेवटच्या महत्वाच्या दोन्ही मालिका हे अहमदाबादमधील मोटेरा स्टेडीअममध्ये खेळल्या जाणार आहेत. यासाठी दोन्ही संघ गुरुवारी मोटेरामध्ये पोहचले. भारत आणि इंग्लंड संघाकडून शेवटच्या दोन्ही सामन्यासाठी आप-आपले संघ घोषित करण्यात आले आहेत.
उमेश यादवची शार्दूल ठाकूरच्या जागेवर निवड करण्यात आली आहे. परंतु, उमेश यादव फिटनेस टेस्ट उत्तीर्ण झाल्यानंतरच संघात सामील होऊ शकतो. ही टेस्ट एक-दोन दिवसांत होऊ शकते. याव्यतिरिक्त भारतीय संघात जसप्रीत बुमराह आणि इंशात शर्मा आदी वेगवान गोलदांजाचा समावेश आहे.

मोटेरामध्ये कसोटी सामना खेळण्यात मजा येईल – कुलदीप
भारतीय संघाचा स्पिनर कुलदीप यादवने संघासोबत स्टेडीअमचा फोटो शेअर केला. त्यांने लिहिले की, “मोटेरा, एक भव्य स्टेडियम असून निर्मात्याने याचे विलक्षण काम केले आहे. खूप चांगल्या सुविधा दिल्या जात आहे. येथे सामने खेळण्यास मजा येईल.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button