जयंत पाटील यांच्यापाठोपाठ खडसेंनाही कोरोनाची लागण

मुंबई : राज्यात कोरोना रूग्णांची संख्या नियंत्रणात आली असताना मागील काही दिवसांपासून कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे, दिवसभरात ३ हजारापेक्षा अधिक कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने ठाकरे सरकारची चिंता वाढली आहे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर असतानाच एकनाथ खड़से यांनाही कोरोना झाल्याची बातमी आली आहे.
खडसे यांनी ट्विटवरून याबाबत माहिती दिली आहे, खडसे म्हणाले की, माझी कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली असून माझी तब्येत चांगली आहे. काळजीचे कारण नाही, गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती त्यांनी कार्यकर्त्यांना केली आहे. खडसेंसोबत सून भाजपा खासदार रक्षा खडसे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. रात्री अचानक प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोविड टेस्ट केली असता, माझा टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, तरी गेल्या ८ दिवसांत माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यांनी स्वत:ची कोविड चाचणी करून घ्यावी, माझी प्रकृती स्थिर आहे अशी माहिती रक्षा खडसेंनी दिली आहे.