लाईफस्टाईल

घरी तयार केलेल्या ‘फ्रूट कंडीशनर’चे फायदे

सध्या धकाधकीच्या जिवनात आपण आपल्या तब्येतीची काळजी घेणे अत्यंत गरजेचे. त्याचप्रमाणे आपल्या केसांचीही काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. हवेतील प्रदूषणामुळे, अवेळी खाण्यापिण्याच्या सवयीमुळे आपल्या केसांवरही त्याचा परिणाम होतो. केस गळणे, तुटणे यासारख्या अनेक समस्या निर्माण होतात. हिवाळ्याच्या दिवसात केसांत कोंडा होण्याचे प्रमाण वाढते. हिवाळ्याच्या दिवसात केस जास्तीत जास्त ड्राय होतात. त्यामुळे केस निर्जिव झाल्यासारखे वाटतात. केस निट राहावे यासाठी आपण वेगवेगळे क्रिम्स, कंडिशनर लावतो. मात्र बऱ्याचदा या महागड्या कंडीशनरमुळे केसांचे नुकसानही होते. त्यातील केमिकलमुळे केस गळणे, तुटणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. बाहेरुन आणलेले कंडिशनर वापरण्यापेक्षा घरच्या घरीही कंडिशनर तयार करता येतात. पाहूयात घरच्या घरी फ्रूट कंडिशनर कसे तयार करतात.

कंडिशनर तयार करण्यासाठी एक केळे घ्या. त्या केळ्यात एव्होकाडो( हे एक फळ आहे ) आणि दोन चमचे ऑलिव्ह ऑइल घाला. सर्वात आधी एक केळे घ्या. त्या केळ्याची साल काढून ते व्यवस्थित मॅश करुन घ्या. त्यानंतर एव्होकाडो मिक्सरच्या भांड्यात वाटून त्याची पेस्ट करा. या पेस्टमध्ये केळे घालून ते एकत्र करून घ्या. या मिश्रणात दोन चमचे ऑलिव्ह ऑइल मिक्स करा. हे संपूर्ण मिश्रण एकजीव करुन एका भाड्यांत किंवा डब्यात काढून घ्या. तुमच्या केसांच्या लांबीप्रमाणे कंडिशनरचे साहित्या वाढवून तुम्ही हवे तसे कंडिशनर तयार करू शकता. अशाप्रकारे घरच्या घरी फ्रूट कंडिशनर तयार होते.

तयार झालेले कंडिशनर हे कोरड्या केंसांवर लावा. केस खूपच कोरडे झाल्यासारखे वाटत असल्यास घरगुती फ्रूट कंडिशनर लावा. हे कंडिशनर १० ते १५ मिनिटे केसांना लावून ठेवा. केसांना लावलेला कंडिशनर थंड पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. कंडिशनर केसांना लावल्यामुळे केस मऊ आणि चमकदार होतील.

कंडिशनरमुळे केसांना होतील ‘हे’ फायदे
आठवड्यातून २ ते ३ वेळा कंडिशनर केसांना लावायला हवे. केळ्यामुळे केसांना पोषण मिळते. त्याचबरोबर केसांच्या मुळांसह केस मजबुत होतात. केस चमकदार होण्यसाठी हे कंडिशनर मोठी मदत करते. केळ्यामध्ये लोह, पोटॅशिअम, फॉस्फरस, मॅग्नेशिअम,व्हिटामिन सी, ए असते. त्यामुळे केसांना योग्य पोषण मिळते.

एव्होकाडोमुळे केस मॉश्चराइज होतात. एव्होकाडोमध्ये व्हिटिमिन ए, सी, ई आणि के असतात. त्याचबरोबर कॅल्शिअम, कॉपर यासारखी पोषक तत्त्वे एव्होकाडोमध्ये असतात. त्यामुळे हानिकारक गोष्टींपासून केसांचे संरक्षण होते. ऑलिव्ह ऑइलमुळे केसांच्या मुळाशी ओलावा टिकून राहण्यास मदत होते. त्याचप्रमाणे बाहेरील धुळ, प्रदूषणापासूनही केसांचे संरक्षण होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button