कोरोनाच्या काळात कॅन्सरवरील उपचाराचे प्रमाण घटले
डॉ राकेश बधे, ऑन्को-सर्जन, कर्करोगतज्झ, वोकहार्ट हॉस्पिटल, मुंबई सेंट्रल
कोव्हीड-19च्या उद्रेकाला प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय स्तरावर संपूर्ण टाळेबंदीची घोषणा 25 मार्च 2020 रोजी करण्यात आली. दरम्यानच्या काळात भारतात अनेक अभूतपूर्व घटना घडल्या. सुमारे 70% रुग्णांना जीवरक्षक शस्त्रक्रिया तसेच उपचारांपासून वंचित राहावे लागले. केमोथेरपी तसेच फॉलो-अप पुढे ढकलण्यात आल्या. अगदी मुख्य भारतीय शहरांमधील कर्करोग देखभालीकरिता वैद्यकीय उपचार घेण्यासाठी रुग्णालयांत जाणाऱ्या रूग्णसंख्येत आसपास 50%ने घट झाली. 2019च्या तुलनेत शस्त्रक्रियांमध्ये देखील एक-पंचमांश टक्क्यांची घट नोंदवण्यात आली.
सर्व रुग्णालयांकडून घेण्यात येणारी सर्वसामान्य खबरदारी:
1. रुग्णालयात प्रवेश करतेवेळी (थर्मल गनच्या साह्याने) प्रत्येकाच्या शरीराचे तापमान नोंदवणे, त्याचप्रमाणे अलीकडचा प्रवास, ताप, सर्दी-खोकला इ. वैद्यकीय इतिहासाची नोंद करणे.
2. रुग्णासोबत येणाऱ्या व्यक्तींच्या संख्येला मर्यादा लावून, रुग्णासमवेत केवळ एकाच व्यक्तीला परवानगी देणे.
3. रुग्णालयाच्या प्रतिक्षालयात (डॉक्टरांनी केबिनमध्ये बोलावेपर्यंत, जिथे बसावे लागते ती जागा) सोशल डिस्टन्सिंगच्या उपाययोजना राबवणे.
4. सर्वांनी मुखपट्टी लावणे अनिवार्य.
5. रुग्णालयाच्या संकुलात निरनिराळ्या ठिकाणी अल्कोहोल-मिश्रित हँड सॅनिटायजर आणि हँड वॉशिंग सोल्यूशन्सची सुविधा करणे.
6. आजारी व्यक्तीच्या ट्रायजिंगकरिता निराळ्या जागेची सोय करणे.
7. एकसारखी ये-जा असणाऱ्या सार्वजनिक परिसरांत सोडियम हायपोक्लोराईट सोल्यूशनची फवारणी करणे.
8. सर्वच वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी संरक्षक मुखपट्टी वापरावी तसेच जे कर्मचारी थेट रुग्ण संपर्क किंवा बाधित रुग्णाच्या कचऱ्याच्या संपर्कात येतात त्या सर्व एचसीडब्ल्यूनी वैयक्तिक संरक्षक साहित्य (पीपीई)चा वापर करणे.
9. सर्व ओपीडी संबंधित प्रक्रिया या संपूर्ण पीपीई तसेच मुखपट्टीचा वापर करून करण्यात आल्या पाहिजे. एअरोसोलची निर्मिती करणाऱ्या प्रक्रिया केल्या जाणार नाहीत.
10. ऑपरेटींग रूम्स, सीटी आणि आरटी परिसराकरिता खास खबरदारी.
11. रुग्ण आणि वैद्यकीय सल्लागार यांच्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंग तसेच व्यवस्थापकीय बैठकांकरिता व्हर्च्युअल मिटींगची सुविधा.
विशेष सर्जिकल ऑन्कोलॉजी (कर्करोग शस्त्रक्रिया विभाग) खबरदारी:
शस्त्रक्रिया कराव्या लागणाऱ्या रुग्णांना तीन प्रवर्गात विभागण्यात आले :
• लघु शस्त्रक्रिया < 45 मिनिटांच्या.
• मध्यम स्वरुपाच्या शस्त्रक्रिया 45 मिनिटे किंवा 2 तासांपर्यंतच्या.
• दीर्घ शस्त्रक्रिया > 2 तासांहून जास्त कालावधीच्या
ज्या रुग्णांना दीर्घ शस्त्रक्रियेची आवश्यकता होती, त्याविषयीची चर्चा ट्युमर बोर्ड (टीबी)मध्ये करण्यात आली तसेच प्रक्रियेचे औचित्य सिद्ध करण्यासाठी महत्त्वपूर्ण मूल्यांकन करण्यात आले.
विशेष केमोथेरपी खबरदारी:
रुग्णालयातील भरती होणाऱ्या रुग्णांची संख्या मर्यादीत राहावी याकरिता सिटीकरिता आलेल्या बहुसंख्य रुग्णांना सिंगल-ड्रग थेरपी देण्यात आली. ज्या थोड्याफार रुग्णांना मल्टी-ड्रग सिटीची आवश्यकता होती, त्यांना देखील परिणामांशी तडजोड न करता सिंगल-ड्रग सीटी देण्यात आली. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आणि संसर्गाचा प्रादुर्भाव होण्यास अटकाव झाला.
रेडियोथेरपी खबरदारी:
कर्करोगग्रस्त 50% रुग्णांमध्ये आरटीची आवश्यकता असते, सुमारे 40% पर्यंत रुग्ण कर्करोगातून मुक्त होतात. मात्र अलीकडे उदभवलेल्या अभूतपूर्व महामारीच्या स्थितीत, बहुतांशी केसमध्ये आरटी उपचार ‘ट्रीटमेंट ऑफ चॉईस’ बनला.[6]
कर्करोग संशोधनावर परिणाम:
सध्याच्या कठीण परिस्थितीत कर्करोगग्रस्त रुग्ण आणि आरोग्य-निगा कर्मचारीवर्गाकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली, यात निश्चितपणे दुमत नसावे. तरीच जोखीम-लाभ गुणोत्तर लक्षात घेणे अत्यावश्यक ठरते. आरोग्य-देखभाल व्यवस्थापनाशिवाय, संसर्ग उद्रेकाचा सर्वाधिक परिणाम झालेले क्षेत्र हे कर्करोग संशोधनाचे आहे. भारतात कर्करोगाकरिता प्राप्त होणाऱ्या निधीत 5% ते 100% पर्यंतची घट झाल्याचे हाती आलेल्या निष्कर्षातून स्पष्ट होते. कारण बहुसंख्य फंडींग एजन्सींनी हात आखडता घेतला. खासगी/ सेवाभावी क्षेत्राला महासाथीचा मोठा फटका बसला. निधी रकमेत सुमारे 60% अधिकची घट झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते. कर्करोग संशोधन करणाऱ्यांच्या दृष्टीने ही बाब चिंतेत टाकणारी आहे. या परिस्थितीमुळे कर्करोग संशोधनातील प्रगतीला बाधा निर्माण झाली.
निष्कर्ष:
1. कर्करोग देखभाल ही प्रत्येक रुग्णाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाब आहे. अगदी गंभीर स्वरुपाच्या महासाथी दरम्यान शुद्ध-गुंतागुंतरहित आणि काळजीपूर्वक प्रोटोकॉलची अमलबजावणी रास्त ठरते.
2. संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रारंभिक काळात आणि समन्वय राखून नियोजन करावे. जेणेकरून किमान परिणामांसोबत कर्करोग बाधितांची सेवा करण्यासाठी युनिट सज्ज होतील.
3. पॉझिटीव्ह एचसीडब्ल्यूसोबत कमीत-कमी/शून्य संपर्क राखणे, अलगीकरण तसेच विलगीकरण यासाठी पुरेशा आणि योग्य त्या उपाययोजना राबवणे, जेणेकरून कर्मचारी आणि रुग्णांमध्ये आत्मविश्वास वृद्धिंगत होईल. या प्रकरणी व्यवस्थापन, प्रशासन आणि राज्यातील आरोग्य प्रशासनकर्त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते.
4. मागील वर्षांच्या तुलनेत महासाथी दरम्यान 30 टक्क्यांहून अधिक रुग्णांना संसर्गाच्या प्रमाणाबाहेरील भीतीपायी गुणवत्तापूर्ण आरोग्य देखभाल उपलब्ध होऊ शकली नाही.
कर्करोग रुग्णांनी काय करावे आणि काय करू नये:
1) कर्करोग रुग्णांनी महासाथी दरम्यान जाणवलेल्या चिंता तसेच उपचारांची चर्चा डॉक्टरांसोबत करावी. उपचारांचा आराखडा तयार करून पुरेशी कर्करोग देखभाल घेऊन कोव्हीड-19चा धोका कमी करावा.
2) सहा फुटांचे अंतर राखून सुरक्षित राहावे.
3) तुमचे हात वारंवार आणि चांगल्याप्रकारे धुवावे. किमान दर 20 सेकंदानी साबण आणि पाण्याचा वापर करून हे करण्याची गरज आहे. जर तुमच्याकडे साबण आणि पाण्याची सोय नसेल, तर 60% अल्कोहोल असलेल्या हँड सॅनिटायजरचा वापर करण्याची दक्षता घ्यावी.
4) सार्वजनिक ठिकाणी वावरताना “सर्वांचा स्पर्श” होत असलेल्या जागा; जसे की, एलेव्हेटरची बटणे, दरवाज्याची हँडल आणि हँडरेल्सच्या संपर्कात आल्यास स्वत:चा चेहरा, नाक आणि डोळ्यांना स्पर्श करणे टाळा.
5) गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका.
6) आवश्यकता नसल्यास भटकंती, सुट्टीतील सहलीला जाणे टाळा, तसेच नियमितपणे दुकानांत खरेदीला जाऊ नका.