लाईफस्टाईल
केळं आणि मधाचा हेअर स्पा
अनेकांना आपले केस सिल्की आणि घनदाट हवे असतात. याकरता अनेक हेअर स्पा वापरले जातात. पण, तुम्ही घरच्या घरी स्वस्तात मस्त असा हेअर स्पा तयार करु शकता. यामुळे तुमचे केस घनदाट आणि सिल्की होण्यास मदत होते.
साहित्य
दोन केळी
दोन चमचे मध
असा तयार करा हेअर स्पा
सर्वप्रथम केळ्याला कुस्करून घ्यावे. त्यानंतर गाळणीने गाळल्यावर निघालेल्या पेस्ट मध्ये दोन चमचे मध टाकावे. ही पेस्ट केसांच्या मुळात लावून अर्ध्या तासापर्यंत लावून ठेवा नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन टाका, असे केल्याने केसांना पोषकता मिळते. तसेच केसं गळणे कमी होते.