करीना-सैफच्या घरी पुन्हा छोट्या नवाबाचं आगमन
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर आणि सैफअली खान यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. शनिवारी रात्री करीना कपूरला ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी सकाळी करीना कपूरची प्रसुती झाली. करीना कपूर दुसऱ्यांदा आई झाली आहे.
यापूर्वी 2016मध्ये जेव्हा करीना पहिल्यांदा गर्भवती होती, तेव्हा तिने त्या कालावधीत काम करण्याचा खूप आनंद घेतला होता.दरम्यानच्या काळात तिने अनेक जाहिरातींचे चित्रीकरण केले होते. बेबी बंपसह करिनाने रॅम्प वॉक केला होता. त्यावेळी तिचा हा रॅम्प वॉक अतिशय प्रसिद्ध झाला होता.
दोन दिवसांपूर्वी सैफची बहीण सबा अली खान हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. तिच्या या पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. सबाने सैफचा एक जुना फोटो शेअर केला होता. यात त्याच्यासोबत लहान इब्राहीमही दिसत आहे. ‘हा एक छोटासा इशारा आहे, माझे चॅम्प’, असे कॅप्शन या फोटोसाबत लिहले होते. त्यामुळे करीनाला पुन्हा मुलगाच होणार, अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगली होती.
गरोदरपणात कायम अॅक्टिव असलेली एकमेव अभिनेत्री
करीना ही बॉलिवूडची एकमेव अभिनेत्री अशी होती जिने गरोदरपणाच्या शेवटपर्यंत काम केले आहे. अनेकदा करीना इव्हेंट्सला हजर राहायची. तर कधी पत्रकारांशी ती संवाद साधायची. दोन दिवसांपूर्वीच ती अमृता अरोराच्या प्री ख्रिसमस बॅशमध्ये सहभागी झाली होती. याशिवाय, प्रेग्नंसीच्या काळात करिनाने घरात बसून न राहता करीना मैत्रीणींसोबत आऊटिंगही केले होते. लीकडेच करीना तिच्या मैत्रिणी मलायका आणि अमृता अरोरासोबत Tip & Toe Nail Club या स्पाबाहेर दिसल्या होत्या.