Uncategorized

कदम परिवाराचे 3 रे राज्यस्तरीय कुळ संमेलन उत्साहात

जगभरातून कदम कुटुंब उपस्थित

ठाणे – कदम परिवार एकत्र येऊन एक सामाजिक बांधिलकी जपली जावी या हेतूने समस्त कदम (मराठा) परिवार महाराष्ट्र राज्य या संस्थेची स्थापना करून राज्यात तिसरे कदम कुटुंबाच्या कुळ संमेलनाचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गढी ताम्हाणे, रहाटेश्वर या गावी करण्यात आले होते. या कार्यक्रम प्रसंगी राज्यभरातील कानाकोपऱ्यात राहणारे तसेच जगभरात राहणारे कदम परिवार एकत्र येऊन मोठ्या उत्साहात कदम परिवाराचे राज्यस्तरीय कुळ संमेलन पार पाडले.
जगभरातील कदम मराठा समाजाला एकजुट करावे या हेतूने या राज्यस्तरीय कुलसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यापूर्वी पहिले संमेलन श्री क्षेत्र तुळजापूर येथे तर दुसरे संमेलन गिरवी, फलटण येथे झाले होते. तिसर्‍या संमेलनासाठी मराठा कदम परिवाराचे कोकणातील प्रमुख गाव असलेले गढीताम्हाणेची निवड करण्यात आली होती. यामुळे सकाळी कदम बंधूंचे कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यानंतर सर्वांनी ग्रामदैवत श्री रहाटेश्वराचे दर्शन घेतले.
संमेलनस्थळी कदम राजवंशीय ध्वजारोहण करण्यात आले. तसेच पारंपारिक गोंधळ कार्यक्रम झाला. त्यानंतर जगभरातून आलेल्या कदम बंधूंनी आपल्या गावाचा, कार्याचा स्वपरिचय करून दिला. दुपारी श्री क्षेत्र तुळजाभवानी मंदिर पुजारी मंडळाचे अध्यक्ष तथा समस्त कदम मराठा परिवार संघटनेचे अध्यक्ष अमरराजे कदम व चंदगड येथील इतिहास अभ्यासक सदानंद गावडे यांनी कदम कुलाचा इतिहास सांगितला. भारतातील कदम परिवारातील राजे व राजवटीचा इतिहास तसेच रामायण काळापासून पुढे महाभारत त्याचप्रमाणे भारतातील सातवाहन, गुप्त, मौर्य, कदंब, छत्रपती शिवाजी आदी प्रमुख राजवटींमध्ये कदम परिवारातील वीर पुरूषांनी केलेले कार्य विषद केले. कदम मराठा समाजातील कर्तृत्ववान पत्रकार अमोल कदम, अर्जुन कदम यांचा यावेळी कदम कुलचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला.
या संमेलनासाठी मुंबई, ठाणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, नाशिक, रायगड, नांदेड, हिंगोली , विजापूर, बेळगाव, गोवा, रशिया येथील कदम मराठा परिवाराचे बांधव उपस्थित होते.
या प्रसंगी समस्त कदम ( मराठा ) परिवार महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची घोषणा करण्यात येऊन अमरराजे कदम- अध्यक्ष, दादासाहेब कदम-उपाध्यक्ष, राजन कदम-उपाध्यक्ष, रामजी कदम-सचिव राजेंद्र कदम -कोषाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
कार्यक्रम प्रसंगी उच्च पातळीवर तसेच सामाजिक, क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचा कदम घराण्याचे कुळ चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button