इंधनाचे वाढते दर गंभीर मुद्दा; केंद्र आणि राज्य सरकारांनी चर्चा करावी : सीतारामन

नवी दिल्ली : देशात अनेक ठिकाणी पेट्रोलच्या दरानं शंभरी गाठली आहे. तर दुसरीकडे डिझेलचे दरही सातत्यानं वाढत आहे. शनिवारी सलग १२ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली. यामुळे जनतेच्या खिशावर मोठा ताण पडत आहे. तर दुसरीकडे इंधन दरवाढीवरून विरोधकांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. याचदरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या मुद्द्यावर भाष्य केलं. हा एक गंभीर आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी चर्चा करून ग्राहकांना योग्य दरात इंधन उपलब्ध करून दिलं पाहिजे, असं त्या म्हणाल्या.
शनिवारी दिल्लीत पेट्रोलच्या दरात ३९ पैशांती वाढ झाली. त्यानंत दिल्लीतील पेट्रोलचे दर ९०.५८ रूपयांवर पोहोचले आहेत. तर डिझेलचेही दर ३७ पैशांनी वाढून ८०.९७ रूपयांवर पोहोचले आहेत. सध्या देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरानं उच्चांक गाठला आहे. देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलच्या दरानं शंभरी गाठली आहे. इंधनाच्या वाढत्या किंमतींमुळे काँग्रेसनंही कंद्र सरकारविरोधात आंदोलन केलं.
महागाईमुळे जनता त्रस्त नाही, याची सवय होऊन जाते
“महागाईचा सामान्य जनतेवर विशेष परिणाम होत नाही. महागाईमुळे जनता त्रस्त झालेली नाही. याची लोकांना आता सवय झाली आहे. सामान्य जनता गाडी घेऊन नाही, तर सार्वजनिक वाहतुकीचा अधिक प्रमाणात वापर करते. पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यामुळे सामान्य जनतेच्या अडचणीत वाढ झालेली नाही,” असा दावा बिहारचे पर्यटन मंत्री नारायण प्रसाद यांनी ळी बोलताना केला. “महागाई वाढल्यामुळे बजेटवर काहीसा परिणाम जाणवतो. मात्र, हळूहळू सामान्य जनतेला याची सवय होते. महागाईला विरोध सामान्य जनता करत नसून, नेतेमंडळी करत आहेत,” असा आरोपही त्यांनी केला.