राजकारण

आमच्या सरकारच्या चुका सहा वर्षांत सुधारता आल्या नाहीत का?

शरद पवार यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल

बारामती : केंद्रात गेली सहा वर्षे तुमचे सरकार आहे. ठीक आहे, आमच्याकडून चुका झाल्या. तर सहा वर्षांत त्या दुरुस्त करता आल्या नाहीत का, असा सवाल करीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आहे.

माळेगाव बु. (ता. बारामती) येथील शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आहेत. या संस्थेच्या सभेसाठी ते शनिवारी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांनी इंधनदरवाढीच्या प्रश्नाकडे पवार यांचे लक्ष वेधले. पंतप्रधान मोदी यांनी पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतीला यूपीए सरकारचे त्यावेळचे धोरण कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे, याबाबत विचारणा केल्यावर पवार म्हणाले की, केंद्र सरकारमध्ये सहा वर्षे सत्तेत असतानादेखील चुका दुरुस्त करता येत नसतील, तर त्यावर चर्चा काय करायची?

सध्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी गुणात्मक शिक्षणाची गरज आहे. त्यासाठी शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे तंतोतंत पालन शिक्षण संस्थांनी करावे. बारामतीसारख्या तालुक्याच्या ठिकाणी राष्ट्रीय अजैविक तण संशोधन व्यवस्थापन संस्था आदी संस्था उभ्या केल्याचे ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button