स्पोर्ट्स
आंध्र प्रदेशाच्या अंध संघाने जिंकली टी 20 क्रिकेट स्पर्धा
बेंगलोर : आंध्रप्रदेशाच्या पुरुष अंध क्रिकेट संघाने राष्ट्रीय पातलळीवरील टी २० स्पर्धा जिंकली आहे. १६ फेब्रुवारी रोजी बँगलोर येथे झालेल्या या सामन्यांमध्ये आंध्र प्रदेशाच्या संघाने ओडिसा संघावर विजय मिळवत राष्ट्रीय विजेतेपदावर आपले नाव दुसऱ्यांदा कोरले.
नाणेफेक जिंकून आंध्र प्रदेशाच्या संघाने दमदार फलंदाजी करत 266 धावसंख्या केली.यामध्ये कर्णधार वेंकटेशवर राव याने ६५ चेंडूत १३२ धावा केल्या.
ओडिशा संघाची सुरुवात संथ झाली . पहिल्या १० षटकात ओडिशा संघ फक्त ७८ धावा बनू शकला. निर्धारित २० षटकात ओडिशा संघ पाच विकेटच्या मोबदलत फक्त १६६ धावा बनू शकला. धडाकेबाज फलंदाजीसाठी आंध्र प्रदेशाच्या कर्णधार वेंकटेशवर रावला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.